• Download App
    अमरिंदर सिंग नव्हे, तर आता थेट काँग्रेसश्रेष्ठींनाच टाकला नवज्योतसिंग सिध्दूंनी “आवाज”; म्हणाले, मला निर्णय घेऊ दिला नाहीत, तर ईट से ईट बजा दुंगा...!!|Not Amarinder Singh, but now directly to Congress stalwarts Navjyot Singh Sidhu "voice"; Said, if I am not allowed to make a decision, then I will play brick by brick ... !!

    अमरिंदर सिंग नव्हे, तर आता थेट काँग्रेसश्रेष्ठींनाच टाकला नवज्योतसिंग सिध्दूंनी “आवाज”; म्हणाले, मला निर्णय घेऊ दिला नाहीत, तर ईट से ईट बजा दुंगा…!!

    वृत्तसंस्था

    अमृतसर – पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातल्यानंतर पंजाब काँग्रेसमधला वाद शमण्याऐवजी जास्तच उफाळला आहे. आतापर्यंत काँग्रेसचे कोणतेही पद मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर आगपाखड करणाऱ्या नवज्योत सिंग सिध्दू यांनी आता थेट पक्षश्रेष्ठींवरच हल्लाबोल केला आहे.Not Amarinder Singh, but now directly to Congress stalwarts Navjyot Singh Sidhu “voice”; Said, if I am not allowed to make a decision, then I will play brick by brick … !!

    वास्तविक कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात जाऊन पक्षश्रेष्ठींनी नवज्योत सिंग सिध्दू यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. पण आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात मला निर्णय घेऊ दिले नाहीत, तर एकेकाची ईट से ईट बजा दुंगा अशी धमकीच देऊन टाकली आहे. ही धमकी त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा त्यांना प्रदेशाध्यक्ष करणाऱ्या काँग्रेसश्रेष्ठींनाच दिल्याचे दिसते आहे. सिध्दू यांच्या धमकीभरल्या भाषणाचा विडिओ व्हायरल झाला आहे.



    दुसरीकडे सिध्दू यांनी नेमलेले सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी आपला सल्ला मागे घेतला आहे. त्यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केले होते. काश्मीर स्वतंत्र असताना भारत आणि पाकिस्तान यांनी बेकायदेशीररित्या त्याच्यावर कब्जा मिळविल्याचा आरोप त्यांनी केला होता.

    आता त्यावर बरेच चर्वित चरण झाल्यानंतर मालविंदर सिंग माली यांनी आपण तो सल्ला मागे घेत असल्याचे पत्रक काढून सांगितले आहे. काँग्रेसचे प्रभारी हरिष रावत यांनी या प्रकरणावर पडदा पडल्याचा दावा केला आहे.

    पण नवज्योत सिंग सिध्दू यांच्या धमकीभरल्या भाषणाबद्दल ते ऐकल्याशिवाय मी त्यांना जाब विचारू शकत नाही, असे हरिष रावत यांनी म्हटले आहे. पण आता हे भाषण व्हायरल झाल्याने त्यावर ते काय प्रतिक्रिया देतात याची प्रतिक्षा आहे.

    Not Amarinder Singh, but now directly to Congress stalwarts Navjyot Singh Sidhu “voice”; Said, if I am not allowed to make a decision, then I will play brick by brick … !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!