वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केरळच्या डाव्या लोकशाही आघाडीने आणि काँग्रेसने चित्रपटावर हेटस्पीचला चालना देणे आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीने सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.No ban on ‘The Kerr’ story, Supreme Court dismisses plea, says film has received certificate, not a case of hate speech
मंगळवारी, न्यायमूर्ती केएस जोसेफ आणि बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाकडून अधिवक्ता निझाम पाशा आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.
त्यांनी खंडपीठाला सांगितले की, हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत 16 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निझाम पाशा कोर्टात म्हणाले – हा चित्रपट हेट स्पीचचे सर्वात वाईट आणि सर्वात खालच्या दर्जाचे उदाहरण आहे. हा चित्रपट केवळ ऑडिओ-व्हिज्युअल प्रपोगंडा आहे.
हे हेटस्पीचचे प्रकरण नाही: SC
यावर उत्तर देताना न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले की, हेटस्पीचचे अनेक प्रकार आहेत. असे नाही की कोणीतरी अचानक व्यासपीठावर जाऊन रँडमली हेटस्पीच पसरवत आहे. चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले असून सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे.
आम्ही या चित्रपटावर कोणताही टॅग लावू शकत नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असेल तर योग्य व्यासपीठ आणि फोरममधून प्रयत्न करावेत.
No ban on ‘The Kerr’ story, Supreme Court dismisses plea, says film has received certificate, not a case of hate speech
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : लव्ह जिहाद हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील दहशतवादी हल्ला!!
- भावनेच्या भरात अंकुश काकडे बोलून गेले, असे पवार साहेब निर्णय मागे घ्या अन्यथा खेड्यातील लोक आत्महत्या करतील!!
- पवारांच्या निर्णयामागे घरातलेच असेल भांडण, तर बाहेरच्यांशी लढायला कशी मिळेल ताकद??
- Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा!