• Download App
    चिदंबरम यांचे खोटे आकडे निर्मला सीतारामन यांनी पाडले उघडे... विकासकामांवर मोदींचा सात वर्षांतील खर्च यूपीएच्या दहा वर्षांच्या दुप्पट! Nirmala Sitharaman rebutted figures given by Chidambaram, said development expenditure by Modi govt is double than UPA

    चिदंबरम यांचे खोटे आकडे निर्मला सीतारामन यांनी पाडले उघडे… विकासकामांवर मोदींचा सात वर्षांतील खर्च यूपीएच्या दहा वर्षांच्या दुप्पट!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे चांगलेच उघडे पडले आहेत. आजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट रिझर्व्ह बँकेंच्या अहवालातील आकडेवारी देऊन माजी अर्थमंत्र्यांनी दिलेल्या खोट्या आकडेवारीला तोंडावर पाडले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये विविध विकासकामांवर व सामाजिक सुरक्षा योजनांवर तब्बल ९०.९० लाख कोटी रूपये खर्च केले आहेत. ही रक्कम डॅ. मनमोहनसिंह यांच्या यूपीए सरकारने (ज्यात चिदंबरम स्वतः अर्थ व गृह खात्याचे मंत्री होते) दहा वर्षांत खर्च केलेल्या रकमेच्या (सुमारे ४९.२० लाख कोटी रूपये) जवळपास दुप्पट आहेत.Nirmala Sitharaman rebutted figures given by Chidambaram, said development expenditure by Modi govt is double than UPA

    “माजी अर्थमंत्र्यांकडून इतक्या खोट्या आकडेवारीची अपेक्षा नाही. एखादा राजकारणी व कधीकाळी ड्रीम बजेट सादर करणारा माजी अर्थमंत्री यांच्यात फरक आहे. परंतु चिदंबरम यांनी अशी खोटी आकडेवारी देऊन तो फरक संपवला आहे. त्यांच्या खोट्या आकेडवारीने ते फक्त विरोधी पक्षातील राजकारणी उरले आहेत,” अशी धारदार प्रतिक्रिया अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठाने पत्रकारांच्याजवळ अनौपचारिकरीत्या व्यक्त केली.

    इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर आकडेवारीचे बाण सोडले होते. त्यांच्या मते, “गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारने इंधन करांतून तब्बल २६.५१ लाख कोटी रूपये गोळा केले आहेत. देशात सुमारे २६ कोटी कुटुंबे आहेत, असे गृहित धरल्यास गेल्या आठ वर्षांत मोदींनी प्रत्येक कुटुंबाकडून सरासरी एक लाख रूपये इंधन कर वसूल केलाय. याउलट पीएम किसान सम्मान, अन्न व खते यांच्यासाठी २.२५ लाख कोटी रूपयेच खर्च केले आहेत.”

    मात्र, चिदंबरम यांची ही आकडेवारी खोडून काढताना निर्मला सीतारामन यांनी जवळपास गेल्या तीस वर्षांपासूनचा रिझर्व्ह बँकेचा डेटाच प्रसिद्ध केला. शिवाय अर्थसंकल्पातील कागदपत्रांचा आधार घेऊन चिदंबरम यांची आकडेवारी कशी फसवी आणि खोटी आहे, हे दाखवून दिले.

    निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेली माहितीपुढीलप्रमाणे (स्त्रोत : रिझर्व्ह बँक) :

    •  २०१४ ते २०२२ या सात वर्षांमध्ये मोदी सरकारने विकासकामांवर तब्बल ९०.९० लाख कोटी रूपये खर्च केले आहेत. याउलट २००४ ते २०१४ या दहा वर्षांत डॅ. मनमोहनसिंह यांच्या सरकारने विकासकामांवर फक्त ४९.२० लाख कोटी रूपये खर्च केले होते.
    •  या विकासकामांवरील खर्चांव्यतिरिक्त मोदी सरकारने यूपीएने घेतलेल्या अब्जावधींच्या तेल रोख्यांवर तब्बल ९३,६८५ कोटी रूपयांचे व्याज भरलेले आहे आणि आणखी १.४८ लाख कोटी रूपये २०२६ पर्यंत देणे बाकी आहे.
    •  या ९०.९० लाख कोटी रूपयांपैकी मोदी सरकारने तब्बल २४.८५ लाख कोटी रूपये इंधन, अन्न आणि खतांच्या अनुदानावर खर्च केले आहेत. याउलट दहा वर्षांत यूपीएने अनुदानावर फक्त १३.९ लाख कोटी खर्च केले होते.
    •  मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत शिक्षण, आरोग्य, रास्त किंमतीतील घरे यासारख्या सामाजिक सुरक्षा सुविधांसाठी तब्बल १० लाख कोटी रूपये, तर पायाभूत सुविधांसाठी २६ लाख कोटी रूपये खर्च केलेले आहेत.

    Nirmala Sitharaman rebutted figures given by Chidambaram, said development expenditure by Modi govt is double than UPA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या