पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या केरळमधील नऊ वर्षांच्या अद्वैतला कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी चक्क विमानाची सफर घडविली. राहूल गांधी त्याला चार्टर्ड विमानात घेऊन गेले आणि विमानाचे तंत्रज्ञानही समजावून सांगितले.Nine-year-old Advait was dream to see plane fulfilled by Rahul Gandhi
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या केरळमधील नऊ वर्षांच्या अद्वैतला कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी चक्क विमानाची सफर घडविली. राहूल गांधी त्याला चार्टर्ड विमानात घेऊन गेले आणि विमानाचे तंत्रज्ञानही समजावून सांगितले.
याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राहूल गांधी कॉकपिटमध्ये अद्वैत या नऊ वर्षांच्या मुलाला विमानाचे तंत्रज्ञान समजून सांगताना दिसत आहे.राहूल गांधी केरळमध्ये दोन दिवसीय प्रचारदौऱ्यावर होते. यावेळी कन्नूर जिल्ह्यातील केझुरकुन्नू या गावात गेले
असता एका स्थानिक हॉटेलात त्यांची आणि नऊ वर्षांच्या अद्वैत याची भेट झाली. अद्वैत अस्खलित इंग्रजी आणि हिंदी बोलत असल्याने त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. पायलट बनण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी राहूल गांधी यांनी सर्व तजवीज केली. अद्वैत आणि त्याच्या वडीलांना स्वत:च्या चार्टर्ड विमानात बोलावले. तेथे विमानाचे कॉकपिट त्याला दाखविले. तेथे विमानाच्या महिला पायलटने अद्वैतला उड्डाणामागचे तंत्रज्ञान समजावून सांगितले.
राहूल गांधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अद्वैतशी संवादाचा व्हिडीओही शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की हे तर पहिले पाऊल आहे. अद्वैतचे स्वप्न साकार होईल अशी समाजरचना तयार करून त्याला प्रत्येक संधी उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे.
Nine-year-old Advait was dream to see plane fulfilled by Rahul Gandhi
इतर बातम्या वाचा…
- कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक
- शेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास
- सुपरस्टार विजय मतदानाला आला चक्क सायकलवरून, फोटोसाठी चाहत्यांकडून पाठलाग
- इस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी
- योगी आदित्यनाथ सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका, १२० पैकी ९४ एनएसएची प्रकरणे ठरवली रद्दबातल