• Download App
    हुरियत कॉन्फरन्सचे "उद्योग" उघड्यावर; जम्मू - काश्मीरच्या युवकांना टेरर फंडिंगद्वारे पाकिस्तानात पाठविण्याचा डाव उघड; चौघांना अटक|Nexus between Pakistan, Hurriyat exposed:4 arrested for procuring medical seats in Pakistan for J-K students

    हुरियत कॉन्फरन्सचे “उद्योग” उघड्यावर; जम्मू – काश्मीरच्या युवकांना टेरर फंडिंगद्वारे पाकिस्तानात पाठविण्याचा डाव उघड; चौघांना अटक

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्स आणि पाकिस्तान यांच्यातल्या गुन्हेगारी संबंधातली साखळी उघडकीस आली आहे. जम्मू काश्मीर मधील युवकांना हुरियत कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि टेरर फंडिंगच्या आधारे पाकिस्तानात उच्चशिक्षणासाठी पाठवायचे आणि तेथे दहशतवादाचे प्रशिक्षण घ्यायचे या साखळीतले महत्वाचे चार लोक आज जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कचाट्यात आले आहेत.Nexus between Pakistan, Hurriyat exposed:4 arrested for procuring medical seats in Pakistan for J-K students

    हुरियत कॉन्फरन्सशी संबंधित हे चार जण जम्मू काश्मीर मधील युवकांना पाकिस्तान मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पाठवत असताना सापडले आहेत. युवकांची फसवणूक करून त्यांना एमबीबीएस शिक्षणाचे आमिष दाखवून पाकिस्तानात पाठवण्यात येत असे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे आता या युवकांना पाकिस्तानात जाण्यापासून रोखण्यात आले आहे.



    मोहम्मद अकबर बट उर्फ जफर बट, फातिमा शाह, मोहम्मद अब्दुल्ला शाह, शहाबाज अहमद शेख अशी हुरियत कॉन्फरन्सचे संबंधित असणाऱ्या व्यक्तींची नावे असून हे सर्व जण युवकांची फसवणूक करून त्यांना पाकिस्तानात हुरियत कॉन्फरन्सच्या माध्यमातून उच्चशिक्षणासाठी पाठवत होते. पोलिसांनी सापळा लावून या चौघांना अटक केली आहे, असे श्रीनगर से पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

    पाकिस्तानात उच्च शिक्षणाच्या नावाखाली भारतीय व्हिसा घेऊन जाणाऱ्यांचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. यापैकी 57 जण सध्या बेपत्ता आहेत. त्यापैकी काही पाकिस्तानात आहेत तर काही जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गुंतले आहेत. यापैकी काही युवकांचा ठावठिकाणा लागला असून त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर युवकांना पाकिस्तानात उच्च शिक्षणाच्या नावाखाली पाठविणाऱ्या हुरियत कॉन्फरन्सच्या चार लोकांना अटक होणे भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

    हुरियत कॉन्फरन्स कोण?

    हीच ती हुरियत कॉन्फरन्सचे आहे, जी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षांपेक्षा वेगळे तिसरी “पार्टी” मानावे, असा आग्रह भारत सरकारकडे धरत असे. म्हणजे काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न नसून त्रिपक्षीय प्रश्न आहे. म्हणजे काश्मीर हा चर्चेतला स्वतंत्र पक्ष आहे, असे मानण्याची हुरियत नेत्यांची मजल गेली होती. काँग्रेसी नेतेही हुरियत नेत्यांना सुरक्षेच्या टेबलवर बोलवत असत.

    पाकिस्तान सरकारही हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांचा मोठा पाहुणचार करत असे. पाकिस्तानचे नेते भारत दौऱ्यावर आल्यावर हुरियतचे नेते पाकिस्तानी नेत्यांचा पाहुणचार करत असत. भारतीय नेत्यांनी खेरीज हुरियतचे नेते स्वतंत्रपणे पाकिस्तानी नेत्यांना भेटत असत. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर हुरियत नेत्यांचे हे सगळे लाड बंद झाले या हुरियतच्या ४ लोकांचे आता हे वेगळे “उद्योग” “बाहेर” आले आहेत…!!

    Nexus between Pakistan, Hurriyat exposed:4 arrested for procuring medical seats in Pakistan for J-K students

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र