विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज 28 मे 2023 नव्या संसद भवनाच्या उदघाटनाची तारीख इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. बनेल. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यात भारताच्या जनतेला आपल्या लोकशाहीला नवीन संसद भवनाच्या माध्यमातून भेट मिळाली आहे. ही केवळ एक वास्तू नाही, तर तर १४० कोटी भारतीयाच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. हे लोकशाहीचे मंदिर आहे. संकल्पाला सिद्धीशी जोडणारा सेतू आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करणारे माध्यम बनेल. आजच्या दिवशी नव्या संसदेत नवा मार्ग आखू आणि विकसित भारताचा संकल्प करू, असे प्रेरक उद्बोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.New Parliament, New Way, Resolve to Develop India; Motivational speech by Prime Minister Narendra Modi
नवीन वस्तू भारताच्या विकासाबरोबर विश्वाच्या विकासाचेही आवाहन करेल
संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. विकसित भारताच्या संकल्पनांची पूर्तता होताना पाहिले. नवीन रस्त्यावर चालतच नवीन प्रतिमा तयार होते. आज नवीन भारत नवीन रस्ता तयार करत आहे. दिशा नवीन आहे, संकल्प नवीन आहे. आज पुन्हा सर्व विश्व भारताच्या संकल्पेच्या दृढतेचा आदर आणि अपेक्षांच्या भावनेने पाहत आहे. जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा विश्व पुढे जात असते. ही नवीन वस्तू भारताच्या विकासाबरोबर विश्वाच्या विकासाचेही आवाहन करेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
जो थांबतो त्याचे भाग्यही थांबते, जो चालत राहतो त्यांचे भाग्यही पुढे जात असते
काही वेळा पूर्वी संसदेत पवित्र संगोलची स्थापना झाली आहे. कर्तव्यपद, सेवापद, राष्ट्रपदाचे हे प्रतीक मानले जात होते. सत्तांतराचे हे प्रतीक मानले जात होते. तामिळनाडूचे संत यावेळी संसदेत आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. माध्यमांमध्ये याविषयी अधिक माहिती प्रसिद्ध झाली आहे. या पवित्र संगोलची मान मर्यादा आपण पुन्हा प्रदान करू, जेव्हा संसदेत कार्यवाही सुरू होईल तेव्हा हा संगोल आपल्याला प्रेरणा देत राहील. भारत लोकशाहीची जननी आहे. वैश्विक लोकशाहीचा मोठा आधार आहे. ती संस्कार, विचार आणि परंपरा आहे. आपले वेद, महाभारत यातून मार्गदर्शन आपल्याला प्रेरणा मिळते. ही संसद देशाच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते, जो थांबतो त्याचे भाग्यही थांबते, जो चालत राहतो त्यांचे भाग्यही पुढे जात असते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आधीची परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नवीन संसद प्रतीक बनले
गुलामीनंतर आपल्या भारताने नवीन प्रवास सुरु केला होता, तो प्रवास अनेक खडतर मार्गातून स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रवेश करत आहे. हा विकासाचा काळ आहे. देशाला नवीन दिशा देणारा काळ आहे. असंख्य आकांक्षांना पूर्ण करणारा अमृत काळ आहे. भारताच्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी या कार्यस्थळाला तितकेच आधुनिक होण्याची आवश्यक होती. एक काळ होता भारताची संस्कृती, परंपरेचा उद्घोष केला जायचा. पण शेकडो वर्षांच्या गुलामीने हा गौरव हिसकावून घेतला गेला. २१व्या शतकाचा नवीन भारत बुलंद निश्चयाने भरलेला आहे. गुलामीला पाठी टाकून आधीची परंपरा पुन्हा प्रस्थापित करत आहे, त्याचे हे नवीन संसद प्रतीक बनले आहे. यात संस्कृती आणि संविधान आहे. एक भारत श्रेष्ठ भारताचे दर्शन होत आहे. लक्ष्य मोठे आहे आणि कठीण आहे त्यासाठी देशवासियांना नवीन संकल्प घ्यायचा आणि नवीन गती पकडायची आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याने त्यावेळी विश्वातील अनेक देशांमध्ये जागृती निर्माण केली. आपला देश स्वतंत्र झालाच पण तेव्हापासून अन्य देशांची स्वातंत्र्याच्या दिशेनं मार्गक्रमण सुरु केले. अनेक देशांना गरिबीमधून बाहेर पाडण्यासाठी प्रेरणा देणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘विकसित भारत @ 2047’ संकल्पनेचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन वचनबद्ध – एकनाथ शिंदे
- द फोकस एक्सप्लेनर : कोण आहेत पद्मा सुब्रमण्यम? ज्यांनी पीएमओला लिहिलेल्या पत्राद्वारे जगासमोर आले ‘सेंगोल’, वाचा सविस्तर
- वैद्यकीय क्षेत्रात ”इंटिग्रेटेड अप्रोच” काळाची गरज – डॉ. माधुरी कानिटकर
- India First : भारताच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे भीष्म पितामह स्वातंत्र्यवीर सावरकर!!