• Download App
    दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियन च्या निवडणुकीत डाव्या गटाचा 24 वर्षांनी पराभव । NDTF Clinches Victory in Delhi University Teachers' Union (DUTA) Polls After 24 Years, Defeats Left-Backed DTF

    दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियन च्या निवडणुकीत डाव्या गटाचा 24 वर्षांनी पराभव

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ टीचर्स युनियनच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी डाव्या गटाचा पराभव झाला आहे युनियनच्या अध्यक्षपदी प्रोफेसर ए. के. बाघी यांची बहुमताने निवड झाली आहे त्यांना साडेतीन हजारांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. NDTF Clinches Victory in Delhi University Teachers’ Union (DUTA) Polls After 24 Years, Defeats Left-Backed DTF

    आत्ता पर्यंत दिल्ली विद्यापीठाचे टीचर्स युनियनचे अध्यक्षपद कोणत्या ना कोणत्या तरी डाव्या गटाकडे राहिले आहे. प्रथमच दीर्घ कालावधीनंतर नॅशनल डेमोक्रॅटिक टीचर्स फ्रंट या संघटनेच्या प्रोफेसर ए. के. बाघी यांनी निवडणुकीत डाव्या गटाच्या उमेदवारांवर मात केली आहे. प्रोफेसर बाघी यांना 3584 मते मिळाली. ते दयालसिंग कॉलेजमध्ये chemistry प्रोफेसर आहेत. तब्बल 24 वर्षांनी NDTF कडे अध्यक्षपद आले आहे. डॉ. आभा देव हबीब यांना 2202 मते मिळाली.



    गेली 5 टर्म्स डाव्या गटाचा पाठिंबा असलेल्या Democratic Teachers’ Front (DTF) उमेदवार विजयी होत होते. गेल्या निवडणुकीत प्रोफेसर रजीब रे यांच्याकडून प्रोफेसर बाघी यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता.

    निवडणुकीत बाकीचे उमेदवार होते, झाकीर हुसेन कॉलेजच्या प्रोफेसर डॉ. शबाना आझमी, 263 मते, डॉ. प्रेमचंद 832 मते. हे उमेदवार पराभूत झाले. एकूण 9446 एवढी मते होती. त्यापैकी 7194 मतदान झाले.

    NDTF Clinches Victory in Delhi University Teachers’ Union (DUTA) Polls After 24 Years, Defeats Left-Backed DTF

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते