विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवारांना जबरदस्त धक्का दिला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदीनुसार शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेऊन ते शिंदे गटाला प्रदान केले. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या दृष्टीने दुसरा महत्त्वाचा धक्का निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदीनुसार काढून घेतला आहे. त्यामुळे शरद पवारांची यापुढची राजकीय स्थिती प्रादेशिक पक्षाचे “राष्ट्रीय” नेते अशी उरणार आहे!! NCP’s status as a national party ends
निवडणूक आयोगाने देशभरातल्या सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या राजकीय दर्जा विषयी स्पष्टीकरण करणारे आणि त्यांची बाजू मांडणारे खुलासे मागविले होते. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तृणमूळ काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश होता. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी या पक्षाकडेही त्यांच्या दर्जाबाबत स्पष्टीकरण आणि खुलासे मागविले होते. निवडणूक आयोगाला या सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट खुलासे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे बाजू मांडली.
मात्र, यापैकी आम आदमी पार्टीची मते आणि खुलासे निवडणूक आयोगाला पटले असून त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे, तर तृणमूल काँग्रेस ममतांची तृणमूल काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने नियमानुसार काढून घेतला आहे.
देशामध्ये 5 पेक्षा अधिक राज्यांमध्ये विशिष्ट लोकप्रतिनिधित्व असणे आणि कोणत्याही निवडणुकांमध्ये 6 % पेक्षा जास्त मते मिळणे हे ढोबळ बनाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा ठरविण्याचे निकष आहेत. हे निकष राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारत राष्ट्र समिती आदी पक्षांना पाळता आले नाहीत. त्यामुळे या सर्व पक्षांचे राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे.
तेलंगणातील भारत राष्ट्र समिती मूळची तेलंगण राष्ट्र समिती ही भारत राष्ट्र समितीच्या नावात के. चंद्रशेखर राव यांनी कन्व्हर्ट केली असली तरी त्या पक्षाचा प्रादेशिक दर्जाही निवडणूक आयोगाने रद्द केला आहे.
NCP’s status as a national party ends
महत्वाच्या बातम्या