विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : आंध्र प्रदेश-ओडिशा सीमा आणि आंध्र प्रदेश-छत्तीसगड सीमेवर अनेक नक्षलवादी आणि म्होरके कोरोनाग्रस्त झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विशाखापट्टणम भागात असलेले नक्षलवादी म्होरके आणि नक्षलवाद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.Naxlite get corona infection
गुप्तचर विभागाने यासंदर्भातील सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे.भद्रादी कोत्तागुडेम, ईस्ट गोदावरी दलम, गालिकोंडा दलम, कोरुकोंडा, पेद्दा बयलू, शबरी एरिया कमिटी, कुंटा एरिया कमिटीशी संलग्न असलेले म्होरके, नक्षलवादी यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे. शरणागती लवकर पत्करल्यास उपचारही तातडीने करणे शक्य आहे, असे आवाहनात म्हटले आहे.
पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या दब्बा पालमशी निगडित जलुमुरी श्रीनू ऊर्फ रैनो, विशाखाशी संलग्न अरुणा, कुमुलवाडाशी संलग्न काकुरी पांडन्ना ऊर्फ जगन पामुलागोंदीची ललिता, पेद्दावाडाचे कोर्रा राजू आणि रामे, शबरी दलमचे गीता आणि चिलका, पोन्गुट्टाचे दिरडा आणि देवी,
अल्ली वागूचे सुशीला, कुंटा एरिया कमिटीशी निगडित उंगा, मासा आणि मांगुडू हे नक्षलवादी कोरोनाबाधित असून ते पूर्व गोदावरी जिल्हा परिसरात फिरत असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे.
Naxlite get corona infection
महत्त्वाच्या बातम्या