• Download App
    गडचिरोलीत घडली खळबळजनक घटना , नक्षलवाद्यांनी जाळली 9 ट्रॅक्टर्स व 2 जेसीबी । Naxals set fire to 9 tractors and 2 JCBs in Gadchiroli

    गडचिरोलीत घडली खळबळजनक घटना , नक्षलवाद्यांनी जाळली 9 ट्रॅक्टर्स व 2 जेसीबी

    सूरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचार अशा आशयाचे बॅनर वाहने झाल्याचे ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते. Naxals set fire to 9 tractors and 2 JCBs in Gadchiroli


    विशेष प्रतिनिधी

    गडचिरोली : शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास गडचिरोलीच्या भामरागडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या इरपनार गावात नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर्स, दोन जेसीबी व एक ग्रेडरगाडी जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.तसेच सूरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचार अशा आशयाचे बॅनर वाहने झाल्याचे ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते.



    दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान ४० ते ५० च्या संख्येने आलेल्या नक्षल्यांनी गावालगत खड्डा खणून त्यातील माती काढण्याचे काम करत असलेल्या कंत्राटदाराच्या ११ वाहनांना आग लावली.हा थरार दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. जाळलेल्या वाहनांमध्ये ९ ट्रॅक्टर आणि २ जेसीबीचा समावेश आहे. यातील १० ते १५ बंदुकधारी पुढे येऊन त्यांनी ही आग लावली. या ठिकाणी लाल रंगाचा बॅनर लावून ते नंतर निघून गेले.

    Naxals set fire to 9 tractors and 2 JCBs in Gadchiroli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bengaluru : बंगळुरूत कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँगरेप; 2 लेक्चररसह 3 आरोपींना अटक; अभ्यासाच्या बहाण्याने मैत्री, नंतर अत्याचार

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर