• Download App
    नवनीत राणांना गुन्हेगारासारखी वागणूक; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटीचे हजर राहण्याचे आदेश!! । Navneet Rana treated like a criminal; Director General of Police, Commissioner ordered to be present in the Privilege Committee of Parliament !!

    नवनीत राणांना गुन्हेगारासारखी वागणूक; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटीचे हजर राहण्याचे आदेश!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी गुन्हेगारासारखी वर्तणूक दिल्याचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात चर्चिला गेला आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला आणि संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटीपुढे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक अमरावतीच्या पोलीस आयुक्त यांच्याविरोधात तक्रार केली होती. Navneet Rana treated like a criminal; Director General of Police, Commissioner ordered to be present in the Privilege Committee of Parliament !!

    नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आता या प्रिव्हिलेज कमिटीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग आणि अमरावती पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.



    मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार आपल्याला अमरावतीच्या पोलीस ठाण्यात बोलावून गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली, अशी तक्रार करत खासदार नवनीत राणा यांनी यासंदर्भात लोकसभेत हक्कभंगाचा ठराव मांडला. लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली या ठरावाची आणि तक्रारीची दखल घेऊनच संसदेच्या प्रिविलेज कमिटीने महाराष्ट्रातील चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी 6 मार्च रोजी दुपारी 3.00 वाजता संसदेच्या प्रिव्हिलेज अँड एथिक्स कमिटीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

    शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको

    2020 मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले त्याची शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 % माफ करावं यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणांनी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली.

    तक्रारींवर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या

    14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. ही तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार खासदार हिना गावित यांच्यासह चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Navneet Rana treated like a criminal; Director General of Police, Commissioner ordered to be present in the Privilege Committee of Parliament !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!