• Download App
    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधींनी ईडी चौकशीत जबाबदारी ढकलली (कै.) मोतीलाल व्होरांवर!!; ईडी सूत्रांची माहिती|National Herald case: Rahul Gandhi shifts responsibility for ED probe (late) Motilal Vora !!; ED Sources Information

    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधींनी ईडी चौकशीत जबाबदारी ढकलली (कै.) मोतीलाल व्होरांवर!!; ईडी सूत्रांची माहिती

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी चौकशी सुरू आहे. आज ईडीने त्यांना चौकशीतून ब्रेक दिला आहे. परंतु गेल्या दोन दिवसात ईडी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत राहुल गांधींनी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग केस मधील इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यांच्यातील सर्व व्यवहारांचे जबाबदारी काँग्रेसचे माजी खजिनदार (कै.) मोतीलाल व्होरा यांच्यावर ढकलली आहे. ईडीमधील सूत्रांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने आपली बातमी दिली आहे.National Herald case: Rahul Gandhi shifts responsibility for ED probe (late) Motilal Vora !!; ED Sources Information

     76 %, 24 % खेळ

    राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे यंग इंडियन कंपनीची तब्बल 76 % शेअर्सची मालकी आहे, तर (कै.) मोतीलाल व्होरा आणि (कै.) ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे 12 % – 12 % अर्थात 24 % मालकी होती. त्यामुळे यंग इंडियन कंपनीवर पूर्णपणे गांधी कुटुंबियांचा कंट्रोल आहे. कंपनीच्या संस्थापकांपैकी सुमन दुबे आणि सॅम पित्रोडा यांनी आपापले शेअर्स राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नावे वर्ग केले होते. त्यामुळे दोघांचे शेअर्स 38 – 38 % झाल्यानंतर आपोआपच कंपनीची मालकी गांधी परिवाराकडे आली.



    यंग इंडियन – एजेएल व्यवहार

    परंतु, आता ईडी चौकशी दरम्यान राहुल गांधींनी इंडियन कंपनी आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड अर्थात एजेएल यांच्यातील कुठल्याही व्यवहारांची माहिती आपल्याला व्यक्तिगत पातळीवर नसल्याची नसल्याचा दावा चौकशीत केला आहे. यंग इंडियन आणि एजेएल लि. यांच्यातील प्रत्येक व्यवहार फक्त काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांनाच माहिती होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांचे निधन गेल्याच वर्षी झाले आहे.

    अर्थात ईडीने अधिकृत पातळीवर या चौकशीची माहिती दिलेली नाही. ईडीची चौकशी हा न्यायालयीन विषय असल्यामुळे केवळ लिक झालेल्या माहितीच्या आधारे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता येणार नाही, असे काँग्रेसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

    मात्र राहुल गांधींनी गांधी परिवारावरची जबाबदारी आता निधन पावलेल्या मोतीलाल व्होरा यांच्यावर ढकलून मोकळा झाल्याची चर्चा राजधानी नवी दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    चौकशीला आज ब्रेक

    राहुल गांधी यांच्या चौकशीसाठी आज नेत्यांना ब्रेक दिला आहे. त्यांना पुन्हा उद्या चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. आज राहुल गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत सामील झाले आहेत. यानंतर या बैठकीनंतर काँग्रेसचे लोकसभेतील नेते अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने लोकसभेचे सभापती ओम बिरला यांची भेट घेऊन राहुल गांधी यांच्या रूपाने एका खासदारावर चौकशी कशी लादली जात आहे, त्यांच्यावर कसा अन्याय होतो आहे, या संदर्भात निवेदन दिले आहे.

    National Herald case: Rahul Gandhi shifts responsibility for ED probe (late) Motilal Vora !!; ED Sources Information

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य