• Download App
    संवेदनशील पंतप्रधान! जनरल हुडांच्या बहिणीचे ट्विट Narendra Modi who expressed concern over the case. Truly humbled and honoured on receiving his call

    PM Modi : संवेदनशील पंतप्रधान! जनरल हुडांच्या बहिणीचे ट्विट लगेच पीएम मोदींचा कॉल- मदतीचे आश्वासन-हुडा म्हणाले Thank you

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांचे सैन्य दलातील जवान, अधिकारी आणि त्यांच्या नातलगांविषयीच्या संवेदना समोर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीला मोठे आश्वासन दिले आहे.Narendra Modi who expressed concern over the case. Truly humbled and honoured on receiving his call

    लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीला कर्करोग (कॅन्सर) झाला आहे. उपचारासाठी त्यांना अमेरिकेत मिळणाऱ्या विशिष्ट औषधांची आवश्यकता आहे. या औषधांना भारतात अद्याप परवानगी दिलेली नाही. यामुळे विशेष परिस्थती म्हणून संबंधित औषधे मागवण्याची आणि त्यांचे सेवन करण्याची परवानगी द्यावी; अशा स्वरुपाची विनंती करणारे ट्वीट लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीने केले.

    ट्वीट करताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांच्या बहिणीने पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे कार्यालय, लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालनालय आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांना टॅग केले होते. हे ट्वीट लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग करुन रीट्वीट केले. यानंतर थोड्याच वेळात पंतप्रधान कार्यालयाने संपर्क केला.

    पंतप्रधान कार्यालयाने लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांची बहीण सुषमा हुडा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच सुषमा हुडा यांना हव्या असलेल्या औषधाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. आपल्या विनंतीचा तातडीने विचार होईल; असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने पंतप्रधान कार्यालयाने दिले. कोण आहेत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा

    दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या हल्ल्यानंतर भारताने उरी येथील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केला होता. या सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी केले होते.

    Narendra Modi who expressed concern over the case. Truly humbled and honoured on receiving his call

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistani hackers : पाकिस्तानी हॅकर्सनी भारतावर सायबर हल्ला केला; आर्मी स्कूल-एअरफोर्सची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न

    Robert Vadra : रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात कानपूर न्यायालयात याचिका दाखल; म्हणाले होते- भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो

    पवारांना डॉ. रामचंद्रनकडे घेऊन जायचा भाऊंचा सुप्रिया सुळेंना सल्ला, पण दिल्लीतल्या “बड्या डॉक्टरांच्या” उपचारांना पवारांचा “व्यवस्थित” प्रतिसाद!!