Narada Sting Case : नारदा स्टिंग केसमध्ये अटक झालेले तृणमूल कॉंग्रेसचे चार नेते आता घरात नजरकैदेत राहतील. कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती अरिजित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. Narada Sting Case Kolkata High Court Orders House Arrest To Accused Four TMC Leaders
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : नारदा स्टिंग केसमध्ये अटक झालेले तृणमूल कॉंग्रेसचे चार नेते आता घरात नजरकैदेत राहतील. कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती अरिजित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
तृणमूल नेते सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा, फिरहद हकीम आणि पक्षाचे माजी नेते सोवन चटर्जी यांना जामीन देण्यास अरिजित बॅनर्जी यांनी मान्य केले. परंतु कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल हे जामिनाविरुद्ध होते. त्यामुळे आता या प्रकरणात एक मोठे पीठ सुनावणी घेईल, तोपर्यंत तृणमूल नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी उच्च न्यायालयाने सोमवारी रात्री जामिनावर स्थगिती दिली होती. या चौघांना सोमवारी सीबीआयने नारदा स्टिंग प्रकरणात अटक केली होती आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. खंडपीठाने बुधवारी सुनावणी एका दिवसासाठी तहकूब केली होती.
काय आहे प्रकरण?
2014 मध्ये, कथित स्टिंग ऑपरेशन नारदा टीव्ही वृत्तवाहिनीच्या मॅथ्यू सॅम्युएलने केले होते, ज्यात तृणमूल कॉंग्रेसचे मंत्री, खासदार आणि आमदार लाभाच्या बदल्यात कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेतल्याचे दिसून आले. पश्चिम बंगालमध्ये 2016च्या विधानसभा निवडणुकीच्या ठीक अगोदर ही टेप सार्वजनिक करण्यात आली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भात मार्च 2017 मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.
Narada Sting Case Kolkata High Court Orders House Arrest To Accused Four TMC Leaders
महत्त्वाच्या बातम्या
- लैंगिक शोषण प्रकरणाततून तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, २०१३ मध्ये दाखल झाली होती एफआयआर
- Gadchiroli Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू, 13 नक्षलवादांचा खात्मा
- कोरोनाची दुसरी लाट डॉक्टरांसाठीही घातक, तीनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू
- तेलंगणमधील युवकाने बनविला जबरदस्त ‘इलेक्ट्रिक मास्क’, रुग्णांना शुद्ध हवाही घेता येणार
- गोव्यात आठवडाभरात सुमारे पाचशे जणांचा कोरोनाने घेतला बळी