• Download App
    नाना पटोले यांना कॉँग्रेसश्रेष्ठींनी दिली समज, स्वबळाचा नारा पडला थंड|Nana Patole slamed by the Congress stalwarts, the slogan of self-reliance fell cold

    नाना पटोले यांना कॉँग्रेसश्रेष्ठींनी दिली समज, स्वबळाचा नारा पडला थंड

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज दिल्याचेही सांगण्यात येत असून त्यामुळे त्यांचा स्वबळाचा नारा थंड पडला आहे.Nana Patole slamed by the Congress stalwarts, the slogan of self-reliance fell cold

    महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते नाना पटोले दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा दिला होता.



    आपण कॉँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्यासही तयार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी छेद दिला आहे. ते म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ.

    नाना पटोले हे संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार धोक्यात नाही. सरकार चांगले काम करत आहे. कॉंग्रेसचे समर्थन कायम राहिल आणि सरकार पाच वर्ष टिकणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Nana Patole slamed by the Congress stalwarts, the slogan of self-reliance fell cold

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    O Panneerselvam : AIADMK मधून निष्कासित माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम DMK मध्ये सामील; CM स्टालिन यांनी सदस्यत्व दिले

    MSC Bank Scam : महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा; कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला; अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट

    WhatsApp : 1 मार्चपासून सिम कार्डशिवाय व्हॉट्सॲप चालणार नाही; सरकारचा मुदतवाढ देण्यास नकार