• Download App
    कोरोनाच्या विविध देशांतील स्ट्रेनचे नामकरण; भारतातील स्ट्रेनला ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ नाव।Naming strains from different countries of the corona; The strains in India are called 'Delta' and 'Kappa'

    कोरोनाच्या विविध देशांतील स्ट्रेनचे नामकरण; भारतातील स्ट्रेनला ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ नाव

    वृत्तसंस्था

    कोरोनाच्या स्ट्रेनचा विविध देशांच्या नावावरून उल्लेख केला जात असल्याने गोंधळ उडत आहे. भारतासह अनेक देशांनी देशांच्या नावानुसार स्ट्रेन ओळखला जाऊ नये, अशी अपेक्षा वक्त केली होती. त्यानुसार जागतिक आरोग्य संघटनेने स्ट्रेनचे नामकरण केलेले आहे. भारतात आढळून आलेल्या दोन्ही स्ट्रेनला नवीन नावं अनुक्रमे ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ या नावाने ओळखले जाणार आहे. Naming strains from different countries of the corona; The strains in India are called ‘Delta’ and ‘Kappa’

    कोरोनाच्या विषाणुमध्ये विविध देशात बदल झाले आहेत. त्याला इंग्रजीत स्ट्रेन असे म्हणतात. अशा विषाणूंना त्या देशाच्या नावाने ओळ्खण्याऐवजी त्यांचे नामकरण करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने विविध देशांच्या मागणीनुसार घेतला. स्ट्रच्या अगोदर देशाचे नाव जोडल्याने त्या देशाची बदनामी होते. त्यामुळे आता नामकरणाचा निर्णय घेतला आहे.

    या स्ट्रेनला नाव देताना ग्रीक वर्णमालेचा आधार घेण्यात आला आहे. भारतात आढळून आलेल्या दोन स्ट्रेन डेल्टा आणि कप्पा अशी नावे देण्यात आली. या शिवाय विविध देशांछटा स्ट्रेनला अल्फा, बीटा , गॅमा….. अशी नावे दिली आहेत.



    नवीन स्ट्रेनच्या नावावरून वाद

    नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच डबल म्युटेंशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. तर सिंगापूर सरकारनंही तेथे आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेने स्ट्रेनला नाव दिली आहेत.

    भारतात आढळले दोन स्ट्रेन

    भारतात कोरोनाचे दोन स्ट्रेन ऑक्टोबर २०२०मध्ये आढळून आले होते. B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असे नाव दिले.

    Naming strains from different countries of the corona; The strains in India are called ‘Delta’ and ‘Kappa’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार