वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे गेली ३७ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री हा मिशी नसलेला आहे. याचाच अर्थ मिशिवाला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशास चालत नसून योगी आदित्यनाथ यांच्यापर्यत ही परंपरा गेली ३७ वर्षे सुरु आहे. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री सुद्धा मिशी नसलेलाच असेल, असे बोलले जाते. Mustache less Chief Minister rulling Uttar Pradesh last 37 years,; Even to Yogi Adityanath
शराबी चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा गाजलेला डायलॉग आहे. मुंछे हो तो नाथूलाल की जैसी, वरना ना हो! हे वाक्य उत्तर प्रदेशाला तंतोतंत सध्या लागू पडत आहे. हा चित्रपट १९८४ मध्ये रिलीज झाला होता. त्यापूर्वी उत्तर प्रदेशाचे सर्व मुख्यमंत्री मिशिवाले होते. त्यामध्ये पहिले मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत त्यानंतर संपूर्णानंद, चौधरी चरण सिंह, हेमवती नंदन बहुगुणा,राम नरेश यादव , वीपी सिंह, श्रीपति मिश्रा यांचा समावेश होता. पण शराबी चित्रपटानंतर सत्तेवर आलेले मुख्यमंत्री चक्क मिशी नसलेले, हा एक योगायोग होता. त्यामध्ये वीर बहादुर सिंह, एनडी तिवारी, मुलायम सिंह यादव, कल्याण सिंह, राम प्रकाश गुप्ता, राजनाथ सिंह, अलिखेश यादव आणि आता योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.