• Download App
    चूक काँग्रेस नेत्यांची; दोष बैलांच्या माथी...!!; महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियावर खिल्ली mumbai congress agitation against price hike, netizens ducks congress over the issue

    चूक काँग्रेस नेत्यांची; दोष बैलांच्या माथी…!!; महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियावर खिल्ली

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – चूक काँग्रेस नेत्यांनी केली आहे आणि दोष बैलांच्या माथी मारला जातोय…!! काँग्रेस नेत्यांनी मुंबईत केलेल्या महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियात भरपूर खिल्ली उडविली जाते आहे. भाजपला तर या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेसवाल्यांची आणि विशेषतः राहुल गांधींची काढायची तर संधीच मिळाली आहे. mumbai congress agitation against price hike, netizens ducks congress over the issue

    त्यामुळे ते सूचतील तसे शब्द वापरून, विविध चित्रांची मिम्स तयार करून त्यांची खिल्ली उडवून घेत आहेत. या सगळ्यात त्या बिचाऱ्या दोन बैलांच्या नावाने देखील चिडवून घेतले जातेय. वास्तविक पाहाता बैलगाडीची ती कपॅसिटी काय… तिच्यावर उभे किती लोक राहिले… त्यांनी गाडीवर उभे राहुन काय काय थेरं केली. आणि शेवटी या नेत्यांच्या गर्दीत वजनामुळे गाडी कोसळली.



    यात त्या बिचाऱ्या बैलांची काही चूक नाही, की बैलगाडीवाल्याची… पण भाजपवाल्यांनी काँग्रेसवाल्यांची खिल्ली उडवताना त्या बैलांनाही सोडलेले दिसत नाही.

    राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हणलेले बैलांना आवडले नाही म्हणून गाडी कोसळल्याची खिल्ली देवेंद्र फडणवीसांनी उडविली. कोणते बैल जोडायचे ते नीट ठरवा, असा टोला केशव उपाध्येंनी लगावून घेतला.

    बाकी काही असो… पण काँग्रेसवाल्यांनी महागाई विरोधी आंदोलनाची तयारी तर जोरदार केली होती. पण आपल्याच चूकीमुळे गाडी कोसळून आंदोलनाची खिल्ली मात्र, त्यांनी पुरती उडवून घेतली.

    mumbai congress agitation against price hike, netizens ducks congress over the issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट