जन सूरज पदयात्रेच्या 201व्या दिवशी बोलताना पीके यांनी केली टीका
विशेष प्रतिनिधी
पाटणा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, देशात आरजेडीपेक्षा जास्त गुन्हे करणारे आणि गुन्हेगार देशातील दुसऱ्या कोणत्याही पक्षात नाहीत. Most criminals in the country are in RJD Tejashwi Yadav has no knowledge of any subject Prashant Kishor
याचबरोबर तेजस्वी यादव यांना कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही. जन सूरज पदयात्रेच्या 201 व्या दिवशी गुरुवारी वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर ब्लॉक अंतर्गत चक बाफापूर बंथू पंचायत येथून प्रशांत किशोर बोलत होते.
पीके यांनी जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल करत प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारच्या लोकांना मूर्ख समजले जाते, पण तेजस्वी यादव माझ्यापेक्षा इंग्रजी, फ्रेंच चांगले बोलू शकतात का? प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आमच्यापेक्षा चांगले भोजपुरी बोलतील का? तेजस्वीला ना इंग्रजी येतं ना भोजपुरी नीट येतं. त्याने आयुष्यात काहीही वाचले नाही आणि कोणत्याही विषयाचे ज्ञान नाही.
Most criminals in the country are in RJD Tejashwi Yadav has no knowledge of any subject Prashant Kishor
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण