Monsoon Updates : भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, नैर्ऋत्य मॉन्सून मध्य-बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य आणि पूर्वेकडील भागाकडे सरकला आहे आणि 31 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यांत अरबी समुद्रात तौकते आणि बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ आले. या दोन्ही वादळांमुळे देशात बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. Monsoon Updates The southwest monsoon turned to the Bay of Bengal, likely to reach Kerala by May 31
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले की, नैर्ऋत्य मॉन्सून मध्य-बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य आणि पूर्वेकडील भागाकडे सरकला आहे आणि 31 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यांत अरबी समुद्रात तौकते आणि बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ आले. या दोन्ही वादळांमुळे देशात बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
“दक्षिण-पश्चिम मान्सून, 27 मे रोजी मालदीव-कोमोरिन प्रदेश, दक्षिण-पश्चिम आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीच्या काही भागाकडे वळला आहे. हवामान विभागाने म्हटले की, “केरळमध्ये 31 मेच्या सुमारास नैर्ऋत्य मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकेल. केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची सामान्य तारीख 1 जून आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी यास चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये केलेल्या विध्वंसाच्या दुसर्याच दिवशी म्हटले की, या आपत्तीत राज्याला सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी ‘दुआरे तारन’ (डोर-टू-डोर रिलीफ) मोहीमदेखील सुरू केली. बॅनर्जी यांनी चक्रीवादळग्रस्त भागातील मदतकार्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करत म्हटले की, गरज भासल्यास आणखी निधी देण्यात येईल.
Monsoon Updates The southwest monsoon turned to the Bay of Bengal, likely to reach Kerala by May 31
महत्त्वाच्या बातम्या
- CBSE 12th Board Exam 2021 : बारावीची परीक्षा रद्द होणार की नाही, सोमवारी येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Corona Cases In India : देशात 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळले, 24 तासांत 1.86 लाख रुग्णांची नोंद
- GST Council Meeting : ८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक आज बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता
- ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे निर्माते आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बनवणार चित्रपट, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन
- RBI ने म्हटले- आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2000च्या नोटाची छपाई नाही, नोटबंदीनंतर 500 च्या नोटा चलनात सर्वाधिक