• Download App
    मोदींनी संकुचितपणे देशाची कवाडे बंद केली म्हणणाऱ्यांना भारतीय राजदूत फोरमने दाखविला परराष्ट्र धोरणाचा लखलखता आरसा...!! Modi`s foreign policy; not closed one, but an affermative one, argues Forum of Former Ambassadors of India

    मोदींनी संकुचितपणे देशाची कवाडे बंद केली म्हणणाऱ्यांना भारतीय राजदूत फोरमने दाखविला परराष्ट्र धोरणाचा लखलखता आरसा…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवरच्या एकूणातल्या टीकेचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे मोदी संकुचित आहेत. भारताचा विशाल दृष्टीकोन त्यांनी धोरणात्मक पातळीवर संकुचित करून टाकला. भारताची कवाडे बंद करून टाकलीत, हा आहे. पण त्यांचे टीकाकार मोदींच्या परराष्ट्र धोरणातील जी – २० पासून ब्रिक्सपर्यंत आणि हवामान बदलाच्या गटाच्या जागतिक नेतृत्वापासून आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा अलायन्सपर्यंत मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या यशाकडे दुर्लक्ष करतात, असे परखड मत भारतीय राजदूतांच्या फोरमने व्यक्त केले आहे. Modi`s foreign policy; not closed one, but an affermative one, argues Forum of Former Ambassadors of India

    इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून कंवल सिब्बल, श्यामला कौशिक, वीणा सिकरी, भाषावती मुखर्जी या राजदूतांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

    • मोदींनी यूपीए आणि एनडीए सरकारांचेच परराष्ट्र धोरण पुढे चालविले आहे. लूक इस्ट पॉलिसी जुनी आहे. इंडो – पॅसिफिक संकल्पना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी २००७ मध्ये भारताच्या संसदेत मांडली होती. ती यूपीए आणि एनडीए सरकारांनी पुढे नेली. मोदींनी जपानशी संबंध अधिक मजबूत केले. इंडो – पॅसिफिक संकल्पना क्वाडच्या रूपात साकार झाली आहे.
    • जी – २०, जी – ८, ब्रिक्स, शांघाय कोऑपरेशन संघटना, आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स, हवामान बदलावरील जागतिक गट यामधील भारताची भूमिका अधिक वाढती आणि सक्रीय होते आहे.
    • क्वाडच्या रूपाने हिंदी महासागरात चीनविरोधात एक जबरदस्त शक्ती उभी राहते आहे. भारत हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा घटक ठरतोय. समुद्रशक्तीचा वापर भारत पुरेपूर करून घेताना दिसतोय. आखाती देशांमधील बंदरे भारताला खुली होताहेत. हे पूर्वी कधी घडताना दिसत नव्हते. युरोपीय युनियनसमवेत भारताच्या संबंधांमध्ये बरोबरीच्या नात्याने बळकटी येते आहे. मुक्त व्यापार करारात भारताचे मुद्दे महत्त्वाचे गृहीत धरले गेलेत. ही कामगिरी लहान नाही.
    • भारताच्या भूराजनैतिक स्थानाचा एवढा मोठा लाभ आधीच्या सरकारांपेक्षा मोदी सरकारने अधिक करून घेतला आहे.
    • -भारतातल्या सांस्कृतिक प्रतिकांचा मुक्त वापर याच सरकारच्या काळात करवून घेण्यात आला आहे. २१ जून हा जागतिक योग दिवस साजरा होतोय. त्यामागे सरकारच्या धोरणात्मक पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.
    • कोणत्याही संकटात भारताचे भवितव्य उज्ज्वलच आहे, हा विश्वास मोदींनी सर्व स्तरावरच्या गुंतवणूकदारांना दिला आहे. त्याचा लाभ दीर्घकालीन गुंतवणूकीच्या रूपात भारताला मिळतोय आणि भविष्यातही मिळत राहणार आहे.
    • या बाबी लहान सहान नाहीत. किंवा भारताने कवाडे बंद करून घेतल्याच्या द्योतक नाहीत. फक्त टीकाकारांनी जरा डोळे उघडून नीट पाहिले पाहिजे.

    Modi`s foreign policy; not closed one, but an affermative one, argues Forum of Former Ambassadors of India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!