- पंतप्रधान डोळ्यात डोळे घालून बोलतील का??; राऊतांचे राज्यसभेत आव्हान!!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर त्याची तक्रार शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. महाराष्ट्रात ईडीचा वरवंटा अनिल देशमुख, नवाब मलिक आणि मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर फिरत असताना पवारांनी फक्त संजय राऊत यांच्यावरील कारवाई बद्दल पंतप्रधानांकडे तक्रार केली. याचे “राजकीय चंद्रबळ” घेऊन संजय राऊत यांनी राज्यसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.Modi – Pawar – Raut: Pawar calls Raut a “political lunar force”; That is why Raut attacked the Prime Minister
कायद्याचा गैरवापर होत नसल्याचे पंतप्रधान डोळ्यात डोळे घालून बोलू शकतील का?, असा सवाल संजय राऊत राज्यसभेत क्रिमिनल प्रोसिजर कोड बदल कायद्यावर बोलताना केला.क्रिमीनल प्रेसिजर विधेयकावर संजय राऊत यांनी मते मांडली असली तरी प्रामुख्याने त्यांच्यावर झालेली संपत्ती जप्तीची कारवाई,
त्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केलेली तक्रार हाच आधार संजय राऊत यांच्या राज्यसभेतल्या भाषणाला होता. संजय राऊत म्हणाले, की १०२ वर्षांपूर्वीचा कायदा बदलला जातोय. तुमचे मन स्वच्छ असेल तर विरोध करण्याचे कारण नाही. पण गुन्हेगार कोण आहे? जो तुम्हाला प्रश्न विचारणार तो अपराधी बनतो. पोलिसांना राक्षस बनवले जातेय. त्यापेक्षा मार्शल लॅा लागू करा.
या भाषणातून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधातील आपली सगळी भडास काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सभापतींच्या परवानगी अभावी अवघ्या काही मिनिटात संजय राऊत यांना आपले भाषण गुंडाळावे लागले. सध्या बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता अमित शहा राज्यसभेत उत्तर देत आहेत.