monsoon session : 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या काळात केंद्र सरकार 15 बिले सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात डीएनए तंत्रज्ञान विधेयकाचाही समावेश असू शकतो. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात डीएनए तंत्रज्ञान विधेयक, पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण, सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक आणि फॅक्टरिंग रेग्युलेशन दुरुस्ती विधेयक यासह अन्य 15 विधेयके सरकार आणण्याची शक्यता आहे. Modi government is likely to Introduce 15 bills in upcoming monsoon session parliament
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 19 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या काळात केंद्र सरकार 15 बिले सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात डीएनए तंत्रज्ञान विधेयकाचाही समावेश असू शकतो. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात डीएनए तंत्रज्ञान विधेयक, पालक व ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण, सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक आणि फॅक्टरिंग रेग्युलेशन दुरुस्ती विधेयक यासह अन्य 15 विधेयके सरकार आणण्याची शक्यता आहे.
पीयूष गोयल यांनी घेतली विरोधी पक्षांची भेट
दरम्यान, राज्यसभेचे नवनियुक्त सभागृह नेते पीयूष गोयल यांनी 19 जुलैपासून सुरू होणार्या पावसाळी अधिवेशनापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस नेते आनंद शर्मा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. संसद अधिवेशनापूर्वी गोयल यांच्या वरिष्ठ विरोधी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीला विरोधी पक्षांकडून सहकार्य मागण्याचे सरकारचे प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
खरं तर, गोयल यांना नुकतेच राज्यसभेत सभागृहनेते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी थावरचंद गेहलोत यांची जागा घेतली. गेहलोत यांची नुकतेच कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. मान्सून सत्र सोमवारी सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सरकार नवीन विधेयके आणण्याची तयारी करत आहे. यापैकी तीन बिले अशी आहेत, जी सरकारने अध्यादेशाच्या जागी आणली आहेत.
Modi government is likely to Introduce 15 bills in upcoming monsoon session parliament
महत्त्वाच्या बातम्या
- केबल टीव्ही कायद्याला न्यूज ब्रॉडकास्ट असोसिएशनकडून आव्हान, केरळ उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
- पक्ष सोडून जाणाऱ्यांवर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले, आम्हाला निडर माणसं हवी, जे घाबरट आहेत त्यांनी सोडून जावं!
- पाश्चिमात्य माध्यमांचे भारताबाबत पक्षपाती वार्तांकन, कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान एकतर्फी बातम्या दिल्या, IIMCच्या सर्वेक्षणातून खुलासा
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची माजी संरक्षण मंत्र्यांशी भेट, एलएसीवर चीनच्या स्थितीचे दिले स्पष्टीकरण
- कर्जबुडव्या मल्ल्या, नीरव मोदी आणि चोकसीला ईडीचा दणका, बँकांच्या समूहाने वसूल केले 792.11 कोटी रुपये