• Download App
    मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार । modi government cabinet decision briefing by union Minister anurag thakur and piyush goyal

    मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : शाळांमध्ये सुरू होणार पीएम-पोषण योजना, ईसीजीसीचा आयपीओ येणार

    modi government cabinet decision : बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी पीएम पोषण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही योजना 5 वर्षे चालेल आणि त्यासाठी 1.31 लाख कोटी रुपये खर्च येईल. modi government cabinet decision briefing by union Minister anurag thakur and piyush goyal


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये मध्यान्ह भोजनासाठी पीएम पोषण योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही योजना 5 वर्षे चालेल आणि त्यासाठी 1.31 लाख कोटी रुपये खर्च येईल.

    शाळांमध्ये पीएम-पोषण योजना

    अनुराग ठाकूर यांनी असेही सांगितले की, सध्या सुरू असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा समावेश पीएम-पोषण योजनेतच केला जाईल. त्यांनी सांगितले की, यासाठी 1 लाख 31 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. या योजनेत सुधारणा केली जाईल आणि पूर्वीपेक्षा चांगली केली जाईल, असा दावाही त्यांनी केला.

    अनुराग ठाकूर म्हणाले की, शिक्षण मंत्रालय याबाबत संपूर्ण माहिती देईल. त्यांनी असेही सांगितले की, ही योजना राज्यांसह संयुक्तपणे चालवली जाईल, परंतु त्यात केंद्राचा मोठा वाटा असेल. या योजनेअंतर्गत 54 हजार कोटी रुपये केंद्र आणि सुमारे 32 हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. याशिवाय, अन्नधान्यासाठी केंद्राकडून 45 हजार कोटी रुपयेही दिले जातील.

    ईसीजीसीचा आयपीओ येणार

    त्याचबरोबर पीयुष गोयल म्हणाले की, मंत्रिमंडळाने स्टॉक एक्स्चेंजवर आयपीओद्वारे एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (ईसीजीसी) ची लिस्टिंग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांनी सांगितले की, पुढील वर्षी हे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जाईल. पीयूष गोयल यांनी असेही सांगितले की, सरकार ईसीजीसीमध्ये पुढील 5 वर्षांमध्ये 4,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, ज्यामुळे फॉर्मल सेक्टरमध्ये 2.6 लाख रोजगारांसह 59 लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

    त्यांनी असेही सांगितले की, जेव्हा लहान निर्यातदार निर्यात करतात तेव्हा त्यांना विमा संरक्षणदेखील हवे आहे. कोणत्याही कारणामुळे पेमेंट न मिळाल्यास, ईसीजीसी पेमेंटसाठी विमा सुविधा देईल. त्यांनी दावा केला की, 21 सप्टेंबरपर्यंत देशातून 185 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे, जी पहिल्या सहा महिन्यांतील भारताच्या इतिहासात सर्वाधिक आहे.

    पीयुष गोयल यांनी चीनकडून येणाऱ्या सफरचंदांवरील आयात शुल्क कमी करण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ते म्हणाले की, अफवा पसरवल्या जात आहेत की सरकारने चीनमधून येणाऱ्या सफरचंदांवरील शुल्क कमी केले आहे, परंतु असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हे पूर्णपणे निराधार आहे. असे दिसते की काही लोकांकडे फक्त अफवा पसरवण्याचेच काम आहे.

    modi government cabinet decision briefing by union Minister anurag thakur and piyush goyal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य