• Download App
    नाशिकमध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसून बलात्कार; पण पोलीसी कारवाई मात्र आंदोलनकर्त्या भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेविकांवरrape in nashik beauty parlour, but police file cases against BJP MLA and corporaters

    नाशिकमध्ये ब्युटी पार्लरमध्ये घुसून बलात्कार; पण पोलीसी कारवाई मात्र आंदोलनकर्त्या भाजप आमदार सीमा हिरे आणि नगरसेविकांवर

    प्रतिनिधी

    नाशिक – नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यांतर्गत ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणार्‍या आरोपीवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा “अद्भूत पराक्रम” नाशिकच्या पोलिसांनी केला आहे.rape in nashik beauty parlour, but police file cases against BJP MLA and corporaters

    या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून पीडितेसाठी न्याय मागणार्‍यांवरच पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भाजप आमदार सीमा हिरे, पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार, अलका अहिरे, कावेरी घुगे, हर्षा फिरोदिया, नगरसेवक मुकेश शहाणे आणि अन्य कार्यकर्त्यांवर विविध कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.



    या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीकेची झोड उठविली असून न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करणे हा काय गुन्हा आहे का… नाशिकमध्ये काय मोगलाई अवतरली आहे का, असे सवाल केले आहेत.

    rape in nashik beauty parlour, but police file cases against BJP MLA and corporaters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गटशेतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात परिवर्तनाला गती; ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणायचा संकल्प; फार्मर कपचा शुभारंभ!!

    Vishwas Nangare Patil : माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही; RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

    TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती