• Download App
    मोदी, योगींबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींविरुद्ध गुन्हा दाखल । Modi files case against Asaduddin Owaisi for making offensive statements about Yogi

    मोदी, योगींबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींविरुद्ध गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था

    लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलीमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Modi files case against Asaduddin Owaisi for making offensive statements about Yogi

    नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचा धर्मनिरपेक्ष ढाचा उद्‌ध्वस्त करून हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला होता.

    कटरा चंदना येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या रॅलीत मोठी गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे, असदुद्दीन ओवेसी यांनी मास्क घातला नव्हता तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही, अशी माहिती बाराबंकीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.



    आपल्या भाषणात त्यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वीची राम सनेही घाट मशीद प्रशासनाने उद्‌ध्वस्त केली. तसेच मशीदीचा ढिगाराही काढला, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते वस्तुस्थितीच्या विपरित आहे.

    ही मशीद बाराबंकीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर होती. ही मशीद बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उपविभागीय दंडाधिकारी आदर्श सिंह यांच्या आदेशानुसार ती पाडण्यात आली, असा खुलासाही पोलिस अधीक्षकांनी केला.

    Modi files case against Asaduddin Owaisi for making offensive statements about Yogi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!