• Download App
    काश्मीर ऐक्य दिवशी जगाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानचे टूलकिट, भारत घाबरणार नसल्याचे मंत्र्यांनी ठणकावले|Minister urges India not to be intimidated by Pakistan's toolkit to garner world support on Kashmir Unity Day

    काश्मीर ऐक्य दिवशी जगाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानचे टूलकिट, भारत घाबरणार नसल्याचे मंत्र्यांनी ठणकावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानने शनिवारी काश्मीर ऐक्य दिवस साजरा करताना काश्मीरच्या मुद्दय़ावर जगभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी टूलकिट्स तयार केली. मात्र, आमच्या शत्रुराष्ट्राच्या अशा नव्या प्रयोगांमुळे भारताला घाबरवले जाऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ठणकावून सांगितले.Minister urges India not to be intimidated by Pakistan’s toolkit to garner world support on Kashmir Unity Day

    पंतप्रधान कायार्लयात राज्यमंत्री असलेले सिंह येथील भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भारत व पाकिस्तान यांच्यात काही प्रलंबित मुद्दा असेलच, तर तो आमच्या शेजारी देशाच्या अवैध ताब्यात असलेला जम्मू- काश्मीरचा भाग आहे. १९९० पासून दरवर्षी ५ फेब्रुवारीला पाकिस्तान साजरा करत असलेला काश्मीर ऐक्य दिवस करते.



    त्यामुळे पाकिस्तानने काश्मीर ऐक्य दिवस पाळल्यामुळे अस्वस्थ होण्यासारखे काहीही नाही. कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यास आम्ही पुरेसे सज्ज आहोत. १९४७ सालच्या फाळणीच्या मध्यरात्रीपासून, जम्मू व काश्मीर हा भारताचा भाग असल्याची बाब पाकिस्तान स्वीकारू शकलेला नाही व त्यामुळे ते त्यांच्याकडील सर्व क्लृप्तय़ांचा वापर करत आहेत.त्यांनी ३ युद्धे केली आणि आता घुसखोरी करत आहेत.

    १९९४ साली भाजप सत्तेवर नसताना देशाच्या संसदेने एकमताने एक ठराव संमत केला. भारत व पाकिस्तान यांच्यात काही प्रलंबित मुद्दा असेलच, तर तो ७५ वर्षांनंतरही पाकिस्तानच्या अवैध ताब्यात असलेला जम्मू- काश्मीरचा भाग परत मिळवणे हा आहे, असे या ठरावात म्हटले आहे, याची सिंह यांनी आठवण करून दिली.

    Minister urges India not to be intimidated by Pakistan’s toolkit to garner world support on Kashmir Unity Day

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!