• Download App
    भागीदारी मोर्चात एमआयएमला अद्याप प्रवेश नाही, जागावाटपात स्थान देणार नसल्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले स्पष्ट|MIM has not yet joined the partnership front, Omprakash Rajbhar has clarified that it will not give a place in the allotment.

    भागीदारी मोर्चात एमआयएमला अद्याप प्रवेश नाही, जागावाटपात स्थान देणार नसल्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात शंभर जागा लढविण्याचा नारा देणाऱ्या ऑल इंडिया मजलिस ए इतेहदूुल मुस्लिमिनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असुद्दीने ओवेसी यांना भागिदारी मोर्चात अद्याप स्थान दिलेले नाही. या मोर्चाचे प्रमुख सुहलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी एआयएमआयएमसोबत जागावाटप झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.MIM has not yet joined the partnership front, Omprakash Rajbhar has clarified that it will not give a place in the allotment.

    ओवेसी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते की राजभर यांनी तयार केलेल्या भागिदारी मोर्चामधून एआयएमआयएम १०० जागा लढविणार आहे. मात्र, राजभर म्हणाले, आत्तापर्यंत एआयएमआयएमसोबत आत्तापर्यंत कोणतीही बोलणी झालेली नाहीत.



    त्यांना जागावाटपात स्थान देण्याबाबतही चर्चा झालेली नाही. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत लढण्याची त्यांची खरोखरच ताकद आहे का याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच एआयएमआयएमसोबत चर्चा केली जाईल.राजभर म्हणाले ओवेसी यांनी १०० जागा लढण्याची केवळ इच्छा व्यक्त केली आहे.

    मात्र, जागवाटपाचा कोणताही फॉर्म्युल अद्यप झालेला नाही. आपल्या नेतृत्वाखाली तयार झालेला भागिदारी मोर्चा उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, त्यासाठी उत्तर प्रदेशातील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

    त्यामुळे सहकारी पक्षांनी आपली संघटनात्मक ताकद वाढवायला हवी. आमच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही दुर्बलांसोबत जाऊन स्वत:चा पराभव करून घेऊ इच्छित नाही.
    उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने ३८ जागा लढविल्या होत्या.

    मात्र, एकही जागा त्यांना जिंकता आली नव्हती. केवळ ०.२ टक्के मते मिळाली होती. त्याचवेळी सुहलदेव भारतीय समाज पार्टीने भारतीय जनता पक्षासोबत आघाडी केली होती. त्यांना आठ जागा देण्यात आल्या होत्या. त्यांनी ०.७ टक्के मते घेऊन चार जागा जिंकल्या होत्या.

    त्यामुळे गेल्या वेळी एआयएमआयएमपेक्षा मतांची टक्केवारी जास्त असल्याने भागिदारी मोर्चामध्ये राजभर यांचा शब्दच अंतिम आहे.भारतीय जनता पक्षासोबत वितुष्ट आल्याने राजभर यांनी भागिदारी मोर्चाच्य माध्यमातून भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

    यामध्ये एआयएमआयएम, कृष्णा पटेल यांच्या नेतृत्वाखालील अपना दल, माजी मंत्री बाबूसिंग कुशवाहा यांचा जन अधिकार मंच यांचा समावेश आहे. या पक्षांची आघाडी राजकीय पर्याय होऊ शकेल, असे राजभर यांना वाटते. त्याचबरोबर त्यांनी आम आदमी पक्षासोबतही अनेक बैठका घेतल्य आहेत. मात्र, दोन्ही पक्षांकडून अद्याप आघाडीबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

    MIM has not yet joined the partnership front, Omprakash Rajbhar has clarified that it will not give a place in the allotment.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य