वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानातं अडकलेल्या भारतीयांच्या सुखरूप सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार अखंड परिश्रम करत आहे. भारतातून अफगाणिस्तानची राजधानी काबुलला विमान जाते आणि भारतीयांना घेऊन येते, एवढे आपण म्हणतो. पण, तेव्हढे तसे सोपे नाही. त्यासाठी सरकारला द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. merry go round (Dravidian Pranayama) for Mission Kabul in Afghanistan; The Big efforts of the Modi government to bring Indians safely home
भारतातून थेट काबूलला जाण्यासाठी थेट हवाई मार्ग नाही. पाकिस्तानमार्गे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. परंतु,कारण पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास भारताला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भारतातून हवाईदलाचे उडालेले विमान प्रथम इराणला जाते. इराणने तशी परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताचे विमान इराणमार्गे काबूलकडे जाते. येथे अडचण आहे. कारण तालिबानने अफगाणिस्तान व्यापला आहे. विमानतळावरील गर्दी पाहता प्रथम इराणमार्गे आलेले विमान कझाकिस्तानाला जाते. तशी परवानगी भारताला मिळाली आहे. या दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय विमानतळाजवळच्या एका मोठ्या शेडवजा गॅरेजमध्ये एकत्रित केले जातात. भारतीय विमान कझाकिस्तानमध्ये आल्यावर भारतीय अधिकारी स्वतः गाडी घेऊन गॅरेजकडे जातात. त्यासाठी त्यांना तालिबानी चौक्यांतून जावे लागते. तेथून विमानतळाकडे येताना सर्वांची तपासणी होते. विमानतळ सध्या अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे.
ATS कंट्रोल और सिक्योरिटी कंट्रोल व्यवस्था अमेरिकेकडे आहे. त्यांना भारतीय आल्याची माहिती त्यांना द्यावी लागते. परवानगी मिळाल्यानंतर कझाकिस्तान येथील विमानाला काबूलकडे उड्डाण करण्यास सांगितले जाते. विमान काबूल विमानतळावर जेमतेम पंधरा मिनिटेच उभे राहू शकते. कारण गर्दी आणि सुरक्षेचा मुद्दा आहे. या काळात अमेरिकन सैन्याच्या गाडीतून प्रवाशांना विमानतळावर आणले जाते. विमानतळावर आलेल्या भारतीयांना विमानात चढविले जाते.त्यानंतर विमान भारताकडे उड्डाण करते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना केंद्रातील मोदी सरकार नागरिकांची अशा प्रकारे सुटका करत आहे. या मागे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय अधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणूनच जग म्हणत ‘मोदी आहेत म्हणून सर्व शक्य आहे.’ या वाक्याची प्रचिती सर्वत्र येत आहे. आता अफगाणिस्तानातील भारतीयांना आणण्यासाठी मोदी सरकार करत असलेला द्राविडी प्राणायाम हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे.
येथेही पाकिस्तानचा अडेलतट्टूपणा
काबूलला जाण्यासाठी थेट हवाईमार्ग नाही. पाकिस्तानमार्गे जवळचा रस्ता आहे. पण पाकिस्तानने आपल्या हवाई मार्गाचा, हद्दीचा वापर करू देण्यास परवानगी नाकारली आहे. अशा कठीण प्रसंगी त्याने शेजारधर्म पाळलेला नाही. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना श्रीलंकेला जायचे होते. त्यावेळी त्यांना भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी दिली होती. अन्यथा त्यांना मोठा वळसा घालून श्रीलंकेला जावे लागले असते. पण, भारतीय विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून देण्याचे मोठेपण त्यांनी दाखविले नाही. त्यामुळे त्यांची ही अडेलतट्टू भूमिका आता पुन्हा जगजाहीर झाली आहे.
merry go round (Dravidian Pranayama) for Mission Kabul in Afghanistan; The Big efforts of the Modi government to bring Indians safely home
महत्त्वाच्या बातम्या
- आमच्या देशात दहशतवादी नकोत, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना आश्रय देण्यास पुतीन यांचा विरोध
- चीनमध्ये जुलैपासून प्रथमच कोरोनाचा स्थानिक रुग्ण नाही, काटेकोर उपाययोजनांमुळे संसर्ग येतोय आटोक्यात
- तालिबानी राजवट: आता जागतिक बँकेने अफगाणिस्तानला मदत थांबवली , परिस्थितीवर व्यक्त केली गंभीर चिंता
- काश्मीर खोऱ्यात वर्षभरात १०२ दहशतवाद्यांचा खात्मा, लष्करेचे तीन दहशतवादी ठार