वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सन 1971 मध्ये पाकिस्तानने भारतावर लादलेले युद्ध आणि त्यानंतर झालेली स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती या विषयाचे ऐतिहासिक फोटो प्रदर्शन 24 अकबर रोड या काँग्रेसच्या मुख्यालयात आजपासून सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ऑनलाइन केले. त्यानंतर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अनेक काँग्रेस नेत्यांसह या प्रदर्शनाला भेट दिली. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यावेळी उपस्थित होते. Memories of the 1971 Bangladesh creation awakened by the Congress; Photo exhibition at the Congress headquarters in the capital
1971 मध्ये त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याने अत्याचार केले बांगलादेशातील हिंदूंचे शिरकाण केले. त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानचा कठोर मुकाबला केला. युद्धामध्ये पाकिस्तानला हरवून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती केली. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र बांगलादेशला अधिमान्यता देणारा भारत हा पहिला देश ठरला.
या पराक्रमाची आठवण काँग्रेस मुख्यालयात भरवण्यात आलेल्या फोटो प्रदर्शनातून करून देण्यात येत आहे. देशभर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवाचे मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान वर मिळवलेल्या युद्ध विजया संदर्भातले संदर्भातल्या गौरवशाली आठवणी जागविल्या आहेत.
Memories of the 1971 Bangladesh creation awakened by the Congress; Photo exhibition at the Congress headquarters in the capital
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीचे काम योगी सरकारचे, ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात, कानपुर आयआयटीकडून कौतुक
- ऐन दसरा – दिवाळीच्या तोंडावर सिलिंडर दरवाढीने ग्राहक गॅसवर, वर्षात तीनशे रुपयांची दरवाढ
- जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे
- कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप