• Download App
    महाराष्ट्रातील पुणे बनणार औषधी वनस्पती निर्मितीचे केंद्र; औषधी वनस्पतींच्या लागवडीस मोठी सुरुवात |medicinal plants, cultivation program has started from Saharanpur & Pune: AYUSH

    महाराष्ट्रातील पुणे बनणार औषधी वनस्पती निर्मितीचे केंद्र; औषधी वनस्पतींच्या लागवडीस मोठी सुरुवात

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे औषधी वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे पुणे हे भविष्यात औषधी वनस्पती निर्मितीचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.medicinal plants, cultivation program has started from Saharanpur & Pune: AYUSH

    आजच्या घडीला कोरोना संक्रमणामुळे जगभरात योग् आणि आयुर्वेदाला अनन्य साधारण महत्व आले आहे. कारण रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता योग् आणि आयुर्वेदात आहे. आयर्वेदात औषधी वनस्पतींची मोठे महत्व आहे.



    त्यासाठी मोठया प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड काळाची गरज बनली आहे. त्या अंतर्गत आता हा वन औषधी लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.नॅशनल मेडिकल प्लांट बोर्डाच्या पुढाकाराने औषधी वनस्पतीची लागवडी केली जाणार आहे.

    देशात विविध ठिकाणी औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. पुढील वर्षी देशभरात ७५ हजार हेक्टर क्षेत्रात औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्याची सुरुवात पुणे आणि सहारणपुर येथे केली आहे.

    medicinal plants, cultivation program has started from Saharanpur & Pune: AYUSH

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये