विशेष प्रतिनिधी
मुंबई : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षांना स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आता या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.Medical Exams will start on time
१० जूनपासून ही परीक्षा होणार असून, सुमारे ४० हजार विद्यार्थी राज्यात आहेत; मात्र कोरोना संसर्गात परीक्षा घेऊ नये. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना लस द्यावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून याचिकेद्वारे केली होती.
नागपूर खंडपीठाचे न्या. अविनाश घारोटे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. याचिकादार विद्यार्थ्यांनी सेवाभावी क्षेत्रात करिअर करत आहेत. ते भविष्यातील डॉक्टर आहेत. मग असे घाबरून ते नागरिकांना सेवा कशी देणार, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
विद्यापीठाकडून याचिकेला विरोध करण्यात आला. यापूर्वी ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आणि आताही विद्यार्थ्यांना याबाबत पर्याय दिला होता. असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने याचिकेवर पुढील सुनावणी २० जूनला निश्चित केली आहे. सुमारे ४० हजार विद्यार्थी १७० परीक्षा केंद्र आहे
सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे भारतासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशात तातडीने शक्य नाही; मात्र लस हा एकच मुद्दा यामध्ये नसून नागरिकांनी स्वतः हून जबाबदारी घेऊन वागायला हवे, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
Medical Exams will start on time
महत्त्वाच्या बातम्या
- उमर खालिद, खालिद सैफी म्हणजे काही ‘गँगस्टर’ नाहीत – न्यायालयाने पोलिसांना फटकारले
- सॉफ्ट हिंदूत्वाचा अजेंडा राबवून राहूल गांधी देश बरबाद करताहेत, धर्मनिरपेक्ष देशात राजकारण्यांनी मंदिरांना भेटी देणे गैर, केरळच्या माजी आरोग्य मंत्री शैलजा टिचर यांचा आरोप
- देशांतर्गत विमान प्रवास होणार सोपा, लसीकरण झाले असल्यास आरटीपीसीआर चाचणीची राहणार नाही गरज
- शेअर बाजारात अशीही तेजी, गेल्या वर्षभरात महिन्याला सरासरी १३ लाख नवी डिमॅट अकाऊंटस, गुंतवणूकदारांची संख्या झाली ६.९७ कोटी
- हे कसले कोरोनाविरुध्द लढण्याचे आदर्श मॉडेल, देशातील सर्वाधिक मृत्यूसह महाराष्ट्राने गाठला एक लाख कोरोना बळींचा टप्पा