• Download App
    माथेरानला शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली, पतीच निघाला मारेकरी; पोलिसांकडून ताब्यात । Matheran recognizes headless woman, The husband is the killer; Detained by police

    माथेरानला शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली, पतीच निघाला मारेकरी; पोलिसांकडून ताब्यात

    विशेष प्रतिनिधी

    रायगड : पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एका खोलीत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.परंतु, आता या महिलेची ओळख पटली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पुनम पाल, असे त्या महिलेचे नाव आहे. तर हत्या करणाऱ्या संशयित आरोपी हा पतीच असून रायगड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. Matheran recognizes headless woman, The husband is the killer; Detained by police

    शनिवारी ११ डिसेबंर रोजी एक तरुणी आणि तरुण हे माथेरान येथे फिरायला आले होते. त्यावेळेस, त्यांनी इंदिरानगर येथील एका घरातील खोलीमध्ये वास्तव्य केले. रुबिना बेन आणि अमजद खान, असं खोटं नाव सांगून अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं नमूद केले होते.
    दरम्यान, रविवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार उघडं असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्याला दिवाणाखाली महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला होता.



    या घटनेची माहिती त्यानं पोलिसांना देताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला. त्यावेळी या मृतदेहाचं डोकं कापल्याचं आढळून आलं होतं. यामुळे, पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरु केलं. तपासा दरम्यान, घटनास्थळा पासून काही फुटांच्या अंतरावर झुडपामध्ये एक बॅग आढळून आली होती. त्यामध्ये दवाखान्याच्या एका चिठ्ठीवर मुंबईतील गोरेगाव येथील पत्ता आढळून आला होता.
    माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने महिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाचा फोटोही मिळवण्यात पोलीसांना यश आले.

    यावरून, पोलीसांनी मुंबईतील गोरेगाव येथील पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली असता पुनम पाल ही गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. पुढील तपास केला असता ती नवऱ्याला भेटण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने तपास केला असता माथेरान येथे हत्या करण्यात आलेल्या तरुणीसोबत असलेला तरुण हा तिचा नवरा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यावरून, पुनम पाल हिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या सात महिन्यांपूर्वी मे २०२१ मध्ये लग्न झालेल्या पुनम पाल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या झाल्याची शक्यता पोलिसी सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

    Matheran recognizes headless woman, The husband is the killer; Detained by police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!