Monday, 12 May 2025
  • Download App
    साहेब जादे जोरावर सिंग, फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा होणार!! । Martyr's Day of Saheb Jade Jorawar Singh, Fateh Singh December 26 will be celebrated as Veer Bal Diwas !!

    साहेब जादे जोरावर सिंग, फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा होणार!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे देशभर वीर बाल दिवस म्हणून साजरे करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. Martyr’s Day of Saheb Jade Jorawar Singh, Fateh Singh December 26 will be celebrated as Veer Bal Diwas !!

    शीख गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्व दिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना नमन करताना ही घोषणा केली आहे. साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे गुरुगोविंद सिंग यांच्या चार सुपुत्रांपैकी तिसरे आणि चौथे पुत्र औरंगजेबाच्या मुघल सल्तनतीशी लढताना शीख समाजाने जे शौर्य दाखवले या शौर्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. त्यातही त्यांचे चारही पुत्र औरंगजेबाच्या मुघल सल्तनतीशी लढताना शहीद झाले. ही शहीदी संपूर्ण देशासाठी आणि शीख समाजासाठी अतिशय प्रेरणादायी आहे.

    औरंगजेबासारखा क्रूरकर्माने गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या मुलांवर धर्मांतराची सक्ती केली परंतु त्या सक्तीला न जुमानता त्यांनी हौतात्म्य पत्करले. साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग या दोघांनाही मुघल सैनिकांनी औरंगजेबाच्या आदेशानुसार भिंतीत चिणून मारले. परंतु त्यांनी आपला पवित्र शीख धर्म सोडला नाही आणि ते धर्मांतर करून मुसलमान बनले नाहीत. हे त्यांचे सर्वोच्च बलिदान आहे. या बलिदानाचा सन्मान करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

    साहेब जादे यांची वीरगाथा

    साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाचा अनेक गाथा पंजाब मध्ये लोककथा, लोकगीते या स्वरूपात सादर करण्यात येतात. जोरावर सिंग हे फतेहसिंह यांचे थोरले बंधू. या दोघांना उभे करून मोगल सैनिक भिंत बांधत असताना जोरावर सिंग यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यावेळी फतेहसिंह त्यांना म्हणाले, आपण धर्मासाठी वीरमरण पत्करत आहोत आणि तरीही बंधू तुझ्या डोळ्यात अश्रू!!, त्यावेळी जोरावर सिंग म्हणाले मी मोठा आहे. ही भिंत तुझ्या आधी माझ्या खांद्यापर्यंत यावी, असे मला वाटत होते. हे धैर्याचे उद्गार काही क्षण मुघल सैनिकांनाही विचलित करून गेले. परंतु औरंगजेबासारखा क्रुरकर्मा याला त्याचे काही वाटले नाही. साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्याचा सन्मान करण्यासाठी देशभर इथून पुढे 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येईल.

    14 नोव्हेंबर बालदिन

    पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय वेगळा मानला जात आहे. पंतप्रधान मोदींनी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार या ऐवजी हॉकीचे जादूगार आणि सुपरस्टार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेल रत्न पुरस्कार सुरू केला आहे. आता साहेब जादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांचा शहीदी दिवस 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

    Martyr’s Day of Saheb Jade Jorawar Singh, Fateh Singh December 26 will be celebrated as Veer Bal Diwas !!

    महत्त्वाच्या बातम्या

    तामजाईनगर मधील शिवामृत बिल्डींगमधील फ्लॅटला भीषण आग

    देशात कोरोनामुळे ३१ लाख लोक मरण पावल्याचा सायन्स जर्नलचा अंदाज

    पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी भोवल्या, पंजाब पोलिस महासंचालकपदी व्ही.के.भंवरा

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Icon News Hub