प्रतिनिधी
नवी दिल्ली : हजारो कोटींच्या दारू घोटाळ्यात अडकलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या दारू घोटाळ्यातून आपला कायदेशीर बचाव करण्यासाठी वकिलांवर अक्षरशः कोट्यावधींची उधळण केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टाचे वकील अभिषेक म्हणून सिंघवी यांना मनीष सिसोदियांनी तब्बल 18.97 कोटी रुपयांची फी दिल्याचे ट्विट भाजपचे दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी केले आहे. मनीष सिसोदिया हे वेगवेगळ्या वकिलांवर कोट्यावधी रुपयांची कशी उधळण करत आहेत याची यादीच या ट्विटमधून मनोज तिवारी यांनी दिली आहे.Manish Sisodian spends crores on lawyers to escape liquor scam; Rs 18.97 Crore fee to Abhishek Manu Singhvi!!
दिल्लीतील दारू धोरणामध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. दिल्लीत शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांमध्ये दिल्ली सरकारने उत्तम काम केले आहे म्हणूनच आमच्या दोन मंत्र्यांना मोदी सरकारने जेलमध्ये घातले. पण दिल्लीतले चांगले काम अजिबात आम्ही थांबवणार नाही, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
मनीष सिसोदिया यांनी भ्रष्टाचार केला. दारू उत्पादक आणि वितरकांना 6 टक्क्यांऐवजी 12 % कमिशन मिळवून देण्यासाठी दारू धोरणात परस्पर बदल केला. कागदपत्रे घुसडली म्हणूनच त्यांना सीबीआयने अटक केली. ते योग्यच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे दिल्लीतले नेते अजय माकन यांनी समर्थन केले होते.
मात्र, त्याच काँग्रेस पक्षाचे नेते आणि सुप्रीम कोर्टातील वकील अभिषेक म्हणून सिंघवी यांनी मनीष सिसोदियांचे वकीलपत्र घेतले आहे आणि त्यांची फी म्हणून मनीष सिसोदिया यांनी त्यांना 18.97 कोटी रुपये दिले आहेत. दारू धोरणाच्या विविध केस लढण्यासाठी वकिलांना आत्तापर्यंत 21.50 कोटी रुपये फी दिले गेल्याचे ट्विट खासदार मनोज तिवारी यांनी केले आहे. हा सगळा पैसा मनीष सिसोदिया यांच्या खिशातला नाही, तर दिल्लीच्या करदात्यांचा आहे. ही पैशांची उधळण त्यांनी दारू घोटाळ्यातून वाचण्यासाठी केली आहे, असा आरोप तिवारी यांनी केला आहे.
Manish Sisodian spends crores on lawyers to escape liquor scam; Rs 18.97 Crore fee to Abhishek Manu Singhvi!!
महत्वाच्या बातम्या
- ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं परंतु भविष्य नसतं – देवेंद्र फडणवीस
- आम्ही गद्दारी केली असती तर खासदार तरी झाला असतात का??; उदय सामंतांचे संजय राऊतांच्या वर्मावर बोट
- CPR सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फॉरेन फंडिंग लायसन्स निलंबित!!; कोणाचे आहे सेंटर??, का केली कारवाई??
- “उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?” फडणवीसांचा थेट सवाल!