विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना आता राष्ट्रीय राजकारणात नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पुढील आठवड्यातील ममतांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता संसदीय पक्षाच्या नव्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आहे.Mammatadidi became TMC leader in Parlment
आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ममतांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले असून संसदीय राजकारणामध्ये देखील त्या उतरणार आहेत.
सध्या ‘पेगॅसस’प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून तृणमूलनेही याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममतांचे राष्ट्रीय राजकारणात येणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
सध्या संसदेमध्ये तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला लढविण्याचे काम हे सुदीप बंदोपाध्याय करतात. लोकसभेवर निवडून न येताही संसदेमध्ये पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये ममता बॅनर्जी यांचा समावेश होणार आहे. याआधी सोनिया गांधी यांची १९९८ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संसदीय नेतेपदाची धुरा सांभाळली होती.
Mammatadidi became TMC leader in Parlment
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत नागरिकांचा लस घेण्यास विरोध, लशीबाबत गैरसमज दूर करण्यासाठी चक्क चर्चमध्येच लसीकरण
- तीस तक्रारी दाखल झाल्यावर कन्याकुमारीतील ख्रिश्चन धर्मगुरू आला जागेवर, हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याबाबत मागितली माफी
- भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, विरोधी आमदारांची संख्या कमी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
- ब्राम्हण मतांसाठी गॅँगस्टर विकास दुबेचा बसपला पुळका, उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचे एन्काउंटर करणाऱ्यांचा बदला घेण्याचे सतीशचंद्र मिश्रा यांचे आवाहन