• Download App
    भारतीय सीमेत स्फोटकांसह घुसवलेले पाकिस्तानचे ड्रोन पोलिसांकडून उध्वस्त|Police attacked on Drone in Jammu

    भारतीय सीमेत स्फोटकांसह घुसवलेले पाकिस्तानचे ड्रोन पोलिसांकडून उध्वस्त

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : जम्मू काश्मीलरच्या अखनूर सेक्टरच्या कानाचक येथे पोलिसांनी एक ड्रोन पाडले. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आले आहेत. हे ड्रोन भारतीय सीमेपासून सहा किलोमीटर आतपर्यत आले होते.Police attacked on Drone in Jammu

    ड्रोनचे वजन १७ किलो असून त्याचे सुटे भाग चीन, हॉंगकॉंग आणि तैवान येथे तयार केलेले आहेत. याच श्रेणीतील ड्रोन कथुआ येथे सापडले होते. आतापर्यंत पाठवलेल्या ड्रोनमधून १६ एके-४७ रायफल्स, ३४ पिस्तूल, १५ ग्रेनेड, आयईडी आणि चार लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.



    जम्मू विभागाचे पोलिस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, रात्री १ वाजता सीमेवर ड्रोन आढळून आले. ड्रोनच्या माध्यमातून आणलेले आयईडी स्फोटके तयार स्थितीत होते. त्यावर जीपीएस यंत्रणा होती. हा ड्रोन दहशतवाद्याच्या गटापर्यंत जाणार होता.

    परंतु स्फोटके कोणत्या भागात जाणार होते, हे मात्र समजू शकले नाही. सीमेपासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर आत आलेले ड्रोन पोलिसांनी पाडून दहशतवाद्यांचा मोठा कट हाणून पाडला.

    Police attacked on Drone in Jammu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    North Korea : किम जोंगची हत्या झाली तर उत्तर कोरिया अणुबॉम्ब हल्ला करणार; संविधानात नवीन तरतूद जोडली, हल्ल्यात इराणी सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर निर्णय

    Iran Oil Spill : इराणने 3 हजार बॅरल तेल समुद्रात टाकले; साठवणुकीची जागा कमी पडतेय, होर्मुझ संकट आणि अमेरिका निर्बंधांचा परिणाम

    Iran IRGC : इराणचा इशारा- अमेरिकेचे तळ आणि जहाज निशाण्यावर; अमेरिकेला 14-मुद्द्यांच्या प्रस्तावावर उत्तराची प्रतीक्षा