• Download App
    ममतांचे मिशन मुंबई सुरवातीलाच अर्ध्यावर!!; तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटू शकणार नाहीत |Mamata's mission in Mumbai is halfway through !! !! Chief Minister Uddhav Thackeray will not be able to meet him due to health reasons

    ममतांचे मिशन मुंबई सुरवातीलाच अर्ध्यावर!!; तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटू शकणार नाहीत

    वृत्तसंस्था

    मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याची त्यांची योजना आहे.Mamata’s mission in Mumbai is halfway through !! !! Chief Minister Uddhav Thackeray will not be able to meet him due to health reasons

    सर्व विरोधी पक्षांचे ऐक्य करण्याची त्यांची इच्छा असून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी घेण्याचा यांचा ममता बॅनर्जी यांचा कार्यक्रम आहे.



    परंतु शिवसेना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जी यांना भेटू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तरी देखील ते मंत्रिमंडळाच्या बैठकांना ऑनलाइन उपस्थित राहत आहेत.

    परंतु ममता बॅनर्जी यांचा प्रत्यक्ष मुंबई दौरा असल्याने त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. परंतु तब्येतीच्या कारणास्तव ही भेट होऊ शकणार नाही, असे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.याचा अर्थ ममता बॅनर्जी आता फक्त कदाचित शरद पवार यांची भेट घेतील.

    परंतु त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा दोन दिवसांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अर्ध्यावरच संपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भेटणार नसतील तर फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांची विरोधी ऐक्यासंदर्भात त्यांची चर्चा होऊ शकेल. अर्थात शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री सोडून अन्य कोणी नेता त्यांना भेटणार आहे का नाही, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.

    Mamata’s mission in Mumbai is halfway through !! !! Chief Minister Uddhav Thackeray will not be able to meet him due to health reasons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त