• Download App
    बंगाल घोटाळ्यात ममता सरकारच्या अडचणीत वाढ : ED कोठडीत पार्थ चॅटर्जींची कबुली; म्हणाले- नेत्यांच्या सूचनांनुसार नोकऱ्या दिल्या!|Mamata Govt's Trouble Increases in Bengal Scam Parth Chatterjee's Confession in ED Custody; He said - Jobs were given according to the instructions of the leaders!

    बंगाल घोटाळ्यात ममता सरकारच्या अडचणीत वाढ : ED कोठडीत पार्थ चॅटर्जींची कबुली; म्हणाले- नेत्यांच्या सूचनांनुसार नोकऱ्या दिल्या!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची विश्वासू अर्पिता मुखर्जीशी संबंधित 8 कंपन्यांची बँक खाती फ्रीज अर्थात गोठवली आहेत. चॅटर्जी यांनी या चौकशीत आपण नेत्यांच्या सूचनांनुसार अनेकांना नोकऱ्या दिल्याचा खुलासा केला.Mamata Govt’s Trouble Increases in Bengal Scam Parth Chatterjee’s Confession in ED Custody; He said – Jobs were given according to the instructions of the leaders!

    ED सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी अर्पिता व पार्थ यांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. अर्पिताच्या घरी 28 जुलै रोजी टाकलेल्या धाडीत तब्बल 28 कोटींची रोकड मिळाली होती.



    ‘पेंटहाउस’विषयी माहिती मिळाली, 2 फ्लॅटही

    ED च्या माहितीनुसार, अर्पिताच्या ज्या फ्लॅटमधून 22 कोटींची रोकड मिळाली, त्या सोसायटीत पार्थ यांनी वेगवेगळ्या नावांनी एक पेंटहाऊस व 2 फ्लॅट्स खरेदी केले आहेत. छापेमारीनंतर सोसायटीच्या अॅपमधून या फ्लॅट्सची माहिती काढून टाकण्यात आली.

    एका वृत्तपत्राने सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचा दाखला देत म्हटले आहे की, इमारतीच्या 19 व्या व 20 व्या मजल्यावर 2 फ्लॅट्स आहेत. तर सर्वात वर पेंटहाऊस बांधण्यात आले आहे. पार्थ चॅटर्जी कधीकधी येथे येतात.

    ईडीने शुक्रवारी चॅटर्जींना वैद्यकीय तपासणीसाठी ईएसआयसी रुग्णालयात नेले होते. तिथे त्यांनी आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्याचा आरोप केला.ॉ

    ईडीची 15 ठिकाणी छापे टाकण्याची तयारी

    डायमंड सिटी व बीरभूमलगतच्या 15 ठिकाणांवर ईडीने छापेमारी करण्याची तयारी सुरू केली आहे. ईडीने आतापर्यंत टाकलेल्या 2 छाप्यातून 50 कोटींची रोकड जप्त केली आहे. ईडीच्या चौकशीत अर्पिताने हा सर्व पैसा पार्थ यांचा असल्याचे स्पष्ट केले आहे.

    7 दिवसांच्या कोठडीत पार्थ यांनी प्रथमच ईडी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ यांच्या जबाबामुळे तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते रडारवर येऊ शकतात.

    CBI व प्राप्तिकर खात्याचीही होणार एंट्री

    ED ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात सीबीआय व प्राप्तिकर खात्याची एंट्री होऊ शकते. प्राप्तिकर विभाग बेनामी संपत्ती प्रकरणी पार्थ चॅटर्जी व अर्पिता मुखर्जी यांची चौकशी करू शकते. या दोघांच्या 4 कार्स गायब झाल्याचेही वृत्त आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कारमधून पैसा पळवण्यात आल्याचा दावा केला आहे.

    काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पार्थ चॅटर्जी यांच्या हकालपट्टीमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या गटातील लोक सर्वाधिक आनंदी झालेत.

    पार्थ चटर्जी म्हणाले की, मला एका कटांतर्गत फसवण्यात आले. माझी हकालपट्टी करणे योग्य होते की अयोग्य हे काळच ठरवेल. मी ममतांच्या विधानावर भाष्य करणार नाही.

    आतापर्यंत काय घडले?

    22 जुलै रोजी EDचे पथक छाप्यासाठी पोहोचले. ईडीने पार्थ यांच्या विश्वासू अर्पिताच्या घरातून जवळपास 22 कोटींची रोकड जप्त केली.

    23 जुलै रोजी EDने पार्थ चॅटर्जी यांना हवालाप्रकरणी अटक केली. त्यांना PMLA कोर्टात हजर केले. 2 दिवसांची कोठडी मिळाली.

    24 जुलै रोजी पार्थ चॅटर्जींना आरोग्याच्या आधारावर मिळालेल्या सवलतीला ईडीने हायकोर्टात आव्हान दिले. हाय कोर्टाने पार्थ यांना 3 ऑगस्टपर्यंत कोठडीत पाठवले. तसेच दर 48 तासांना त्यांची आरोग्य तपासणी करण्याचेही निर्देश दिले.

    25 जुलै रोजी कोलकात्यात शिक्षक उमेदवारांनी पार्थ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धर्मतल्लात निदर्शने केली.

    27 जुलै रोजी EDने अर्पिताच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापेमारी केली. 18 तास चाललेल्या या छाप्यात ईडीने जवळपास 28 कोटींची रोकड जप्त केली.

    28 जुलै रोजी ममता बॅनर्जींनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली. बैठकीनंतर पार्थ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. त्याच दिवशी त्यांना पक्षातूनही निलंबित करण्यात आले.

    Mamata Govt’s Trouble Increases in Bengal Scam Parth Chatterjee’s Confession in ED Custody; He said – Jobs were given according to the instructions of the leaders!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक