बंगालच्या उपसागरात आलेल्या यास चक्रीवादळामुळे ओरिसा, प. बंगाल राज्यांमध्ये मोठे नुकसान केले. म्हणून संवेदनशीलतेने या भागाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने गेले. मात्र अजूनही इलेक्शन मोडमध्येच असल्याप्रमाणे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या अहंकाराचे ओंगळवाणे प्रदर्शन करत घटनात्मक मूल्ये, देशाची संघराज्य पद्धत पायदळी तुडवली. Mamata Banerjee’s ego is bigger than constitutional values, Showed her back to the Prime Minister Narendra Modi who came with help
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व संकेत, प्रथा, परंपरांचा चुराडा करत या बैठकीकडेच पाठ फिरवली.
ममता बॅनर्जी यांच्या या अहंकारी वर्तनावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी (दि. 28) जोरदार हल्ला केला. ममता बॅनर्जींचे वर्तन घटनात्मक मूल्ये आणि सहकारी संघराज्य संस्कृतीची हत्या करणारे असल्याची टीका नड्डा यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसा आणि पश्चिम बंगालला भेट दिली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यात चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक मोदींसोबतच्या बैठकीला उपस्थित होते.
ममता बॅनर्जी यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या राज्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठवून देत पुनर्वसन कार्यासाठी तब्बल वीस हजार कोटी रुपयांची मागणी पंतप्रधानांकडे केली.
नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदी संघराज्य संस्कृतीला अत्यंत पवित्र मानतात. त्यामुळेच ते पक्ष, विचारधारा असा भेद न ठेवता देशवासीयांच्या हितासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध ठेवतात.
पण ममतांच्या डावपेचांनी आणि त्यांच्या क्षुद्र राजकारणाने पुन्हा एकदा बंगालच्या लोकांना मनःस्ताप दिला आहे.”यास चक्रीवादळाच्या संकटातून दिलासा देण्यासाठी पंतप्रधान मोदी जेव्हा प. बंगालच्या जनतेसोबत उभे राहतात,
तेव्हा ममताजींनी सुद्धा स्वतःचा अहंकार दूर ठेवून जनतेच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली पाहिजे. पंतप्रधानांच्या बैठकीस गैरहजर राहून त्यांनी घटनात्मक मूल्ये आणि संघराज्य संस्कृतीची हत्या केली आहे,” असे ट्वीट नड्डा यांनी केले आहे.
केंद्रातील भाजपा सरकार आणि भाजपाचे वरीष्ठ नेते पश्चिम बंंगाल सरकारला त्रास देत असल्याचा कांगावा ममता बॅनर्जी नेहमी करत असतात. मात्र स्वतः पंतप्रधान राज्यात आल्यानंतरही त्याकडे गर्वीष्ठ मनाने पाठ फिरवण्याच्या वागण्याचे समर्थन त्या आता कसे करतील,
असा प्रश्न बंगाली जनता विचारत आहे. ममता बॅनर्जी यांनी किमान प्रथा, परंपरांची तरी चाड ठेवायला हवी होती, असेही सुनावले जात आहे.
Mamata Banerjee’s ego is bigger than constitutional values, Showed her back to the Prime Minister Narendra Modi who came with help
महत्त्वाच्या बातम्या
- Monsoon Updates : नैर्ऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराकडे वळला, 31 मेपर्यंत केरळला पोहोचण्याची शक्यता
- राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्याचा विचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
- अनाथांना आधार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ११० अनाथ मुलांचे पालकत्व
- CBSE 12th Board Exam 2021 : बारावीची परीक्षा रद्द होणार की नाही, सोमवारी येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Corona Cases In India : देशात 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळले, 24 तासांत 1.86 लाख रुग्णांची नोंद