• Download App
    समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावत ममता बॅनर्जी यांची उत्तर प्रदेशातही खेला होबेची घोषणा|Mamata Banerjee throws football to Samajwadi Party workers, announces Khela Hobe in Uttar Pradesh too

    समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावत ममता बॅनर्जी यांची उत्तर प्रदेशातही खेला होबेची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला. या निवडणुकीत सपाला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा करत बॅनर्जी यांनी उपस्थित सपा कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावात खेला होबे अशी घोषणा दिली.Mamata Banerjee throws football to Samajwadi Party workers, announces Khela Hobe in Uttar Pradesh too

    बॅनर्जी म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये एनआरसीच्या वेळी एन्काऊंटरच्या नावावर किती लोकांना मारण्यात आलं हे आम्ही पाहिले. खोट्या चकमकींमध्ये लोकांना मारण्याची गरज काय? कायद्याप्रमाणे काम करायला हवे. भाजपाने इतिहास बदलण्याचं काम केलं. भाजपाने शहीद ज्योत नष्ट करण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी खेळ सुरू आहे.



    आमचे शेतकरी आंदोलन करत होते आणि भाजपाच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकºयांना गाडीखाली चिरडून मारलं. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे लोक मरत होते तेव्हा योगी कोठे गेले होते? त्यांनी मृत लोकांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. लोकांना मृतदेह गंगा नदीत सोडण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. यासाठी जनतेची माफी मागा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.

    त्या म्हणाल्या, मोदी म्हणतात आम्ही यूपीला पैसे दिले, तुम्ही स्वत:च्या खिशातून पैसे दिले का? हे सर्व पैसे राज्यांकडून मिळतात. ते जनतेचे पैसे आहेत. आज सकाळी ब्राह्मण समाजाचे लोक मला भेटायला आले होते. त्यांनी मी आल्यानंतर अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं म्हटले आहे.

    Mamata Banerjee throws football to Samajwadi Party workers, announces Khela Hobe in Uttar Pradesh too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख