• Download App
    ममता बॅनर्जींचा अजब तर्क, म्हणाल्या- भाजपमुळे प. बंगालमध्ये वाढला कोरोनाचा संसर्ग । Mamata Banerjee strange argument, Says Corona infection increased in Bengal because of BJP

    ममता बॅनर्जींचा अजब तर्क, म्हणाल्या- भाजपमुळे पश्चिम बंगालमध्ये वाढला कोरोनाचा संसर्ग

    Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी असा आरोप केला की, भारतीय जनता पक्षामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रचार सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप निवडणुकीत प्रचार करण्यासाठी बाहेरील लोकांना आणत आहे आणि यामुळे राज्यात संसर्ग पसरला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले असून मतदानाचे चार टप्पे अद्याप बाकी आहेत. Mamata Banerjee strange argument, Says Corona infection increased in Bengal because of BJP


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी असा आरोप केला की, भारतीय जनता पक्षामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रचार सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप निवडणुकीत प्रचार करण्यासाठी बाहेरील लोकांना आणत आहे आणि यामुळे राज्यात संसर्ग पसरला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले असून मतदानाचे चार टप्पे अद्याप बाकी आहेत.

    यामुळे राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाने वेग पकडलेला असतानाच सर्वच राजकीय पक्ष मोठमोठ्या सभा घेत आहेत, या प्रचंड गर्दीच्या सभांमधून कोरोना नियमावलीचे उल्लंघन होताना दिसत आहे. ममतांच्या सभेलाही अलोट गर्दी झालेली पाहायला मिळतेय. निवडणुकांमुळे सर्वच पक्षांना कोरोनाचा विसर पडल्याचे स्पष्ट असताना स्वत: मुख्यमंत्री असलेल्या ममतांनी केवळ भाजपलाच कोरोना संसर्गासाठी जबाबदार ठरवले आहे.

    जलपायगुडी येथील निवडणुकीच्या मेळाव्यात ममता म्हणाल्या, “त्यांनी (भाजपने) प्रचारासाठी बाहेरील लोक आणले, ज्यामुळे कोरोना प्रकरणांत वाढ झाली. आम्ही कोरोनाच्या परिस्थितीवर विजय मिळविला होता, पण त्यांनी याला गुंतागुंतीचे केले आहे.” ममता बॅनर्जी यांनी असा आरोपदेखील केला की, केंद्र सरकार सर्वांना कोरोना लस देण्याच्या राज्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहे, ज्यामुळे महामारीचा प्रसार रोखता येऊ शकतो.

    निवडणूक आयोगाने 24 तास प्रचारावर बंदी घालण्याच्या निर्णयाबद्दल त्या म्हणाल्या की, “हिंदू, मुस्लिम आणि इतरांना एकत्र मतदान करण्यास सांगणे चुकीचे आहे काय? प्रत्येक निवडणुकीच्या सभेत माझी खिल्ली उडविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय म्हणावं? त्यांना प्रचारापासून का रोखण्यात आले नाही?”

    पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक सभांमध्ये खोटे बोलल्याचा आरोप करत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता म्हणाल्या, “केंद्राने एनआरसी आणि एनपीआर बिले जिवंत ठेवली आहेत, पण गृहमंत्री यांनी सभेत दावा केला होता की त्यांच्याकडे राष्ट्रीय नागरिक रजिस्टर लागू करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.”

    ममता म्हणाल्या, “त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जर ते सत्तेत आले, तर तुम्हालाही आसाममधील 14 लाख बंगालींसारखा अनुभव येऊ शकेल (ईशान्य राज्यातील अंतिम एनआरसीच्या संदर्भात). भाजप हा एक धोकादायक पक्ष आहे, जो बंगालचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ममता म्हणाल्या.

    Mamata Banerjee strange argument, Says Corona infection increased in Bengal because of BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!