• Download App
    कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांशी ममतादीदी सिलिगुडीच्या प्रेस कॉन्फरन्समधून विडिओ कॉलवर बोलल्या|Mamata Banerjee speaks to relatives of victims of Cooch Behar violence on video call from Siliguri press conference

    कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांशी ममतादीदी सिलिगुडीच्या प्रेस कॉन्फरन्समधून विडिओ कॉलवर बोलल्या

    वृत्तसंस्था

    सिलिगुडी : कुचबिहारमधील हिंसाचारात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिलिगुडीतील प्रेस कॉन्फरन्समध्ये विडिओ कॉलवर बोलल्या.Mamata Banerjee speaks to relatives of victims of Cooch Behar violence on video call from Siliguri press conference

    आपण हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांशी बोलतो आहोत, असे त्यांनी मोबाईल फोन पत्रकारांनै दाखवत सांगितले.मी सध्या तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. कारण त्यांनी मला तुमच्याकडे येऊ दिले नाही.



    मी १४ एप्रिललला तुम्हाला येऊन भेटेन, असे ममता बॅनर्जींनी या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी हातातला माईक फोनसमोर धरत त्या कुटुंबीयांचा आवाज ममतांनी पत्रकारांना ऐकविण्याचाही प्रयत्न केला.

    बाकीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. पण यावेळी त्यांचा सूर जरासा बदललेला आढळला. त्या म्हणाल्या, की दररोज तुम्ही बंगाल बळकावण्यासाठी इथे येता.

    तुमचे स्वागत आहे. तुम्ही इथे येऊन लोकांना आनंदी करा ना… त्यांना धमक्या देऊ नका. तुम्ही केंद्रीय दले इथे पाठवून लोकांना मारता आणि वर केंद्रीय दलांना क्लीन चिट देता, हे तुमचे राजकारण आहे आणि बंगालची जनता हे सहन करणार नाही, असा इशाराही ममतांनी मोदी – शहांना दिला.

    Mamata Banerjee speaks to relatives of victims of Cooch Behar violence on video call from Siliguri press conference

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!