पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी आज चौकशी करणार आहे. अभिषेक ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. यादरम्यान ते म्हणाले की, मी इथे आलो आहे कारण एजन्सीने मला बोलावले होते. मी तपास यंत्रणेला सहकार्य करेन. Mamata Banerjee Nephew Abhishek Banerjee ED Coal Smuggling Scam Evidence
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी आज चौकशी करणार आहे. अभिषेक ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. यादरम्यान ते म्हणाले की, मी इथे आलो आहे कारण एजन्सीने मला बोलावले होते. मी तपास यंत्रणेला सहकार्य करेन.
यापूर्वी त्यांनी सीबीआय आणि भाजपवर निशाणा साधला. टीएमसी खासदार म्हणाले, “जर तपास यंत्रणांकडे माझ्याविरोधात पुरावे असतील तर ते सार्वजनिक करा. टीएमसी तुमच्या (भाजपा) समोर कधीही झुकणार नाही. जे काही करता येईल ते करा.” ते पुढे म्हणाले, “जर कोणी हे सिद्ध करू शकला की मी कोणाकडून 10 पैसेही घेतले आहेत, तर मी स्वतः फाशी घेईन.”
अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “मी नोव्हेंबरमध्ये एका जाहीर सभेत सांगितले की मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. त्यांनी मला दिल्लीला बोलावले आहे, जरी प्रकरण कोलकाताशी संबंधित आहे. ते (भाजप) निवडणूक हरले आणि आता सूड उगवणे सुरू आहे. “एजन्सी वापरल्या जात आहेत.” “लाईव्ह टेलिव्हिजन शोमध्ये मी कोणत्याही भाजपच्या राष्ट्रीय नेत्याचा सामना करायला तयार आहे. त्यांना वेळ आणि ठिकाण निवडू द्या. त्यांनी देशासाठी काय केले आणि काय नाही हे मी सिद्ध करेन,” असे आव्हानही त्यांनी दिले.
ईडीकडून आज अभिषेक बॅनर्जीची चौकशी
अभिषेक बॅनर्जी आज दिल्लीत ईडीसमोर हजर झाले आहेत. कोळसा तस्करीशी संबंधित मनी लाँडरिंगच्या प्रकरणात एजन्सी त्याची चौकशी होत आहे. अभिषेक यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांनाही एजन्सीने बोलावले होते, परंतु त्यांनी कोरोना महामारीचा हवाला देत आपल्या घरीच चौकशी करण्याची विनंती केली.
तृणमूल नेत्यांवर कोळसा घोटाळ्याचा आरोप
कोळसा घोटाळ्यात टीएमसी नेत्यांवर आरोप आहेत. त्यात अभिषेक बॅनर्जींच्या नावाचाही समावेश आहे. बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांचा कोळसा बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आला आणि रॅकेटद्वारे काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे. कथित घोटाळ्याची चौकशी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती.
Mamata Banerjee Nephew Abhishek Banerjee ED Coal Smuggling Scam Evidence
महत्त्वाच्या बातम्या
- महामारीशी लढण्यास अर्थव्यवस्था शिकली, अल्पावधीत रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागेल : आरबीआय एमपीसी सदस्य
- अमरुल्लाह सालेह यांचा ‘बचेंगे तो और भी लढेंगे’चा पवित्रा, गार्डला म्हणाले – “जखमी झालो, तर थेट माझ्या डोक्यात गोळी मारा”
- पवार म्हणाले, ‘माझ्याकडे १० वर्षे कृषी मंत्रालय होते, पण शेतकऱ्यांना उत्पादन फेकण्याची वेळ आली नाही’, पण याच कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांचा पडला विसर
- Teachers Day : शिक्षकदिनी महाराष्ट्रातील दोन शिक्षकांसह 44 जणांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; राष्ट्रपतींचे बोधप्रद भाषण, वाचा सविस्तर…