वृत्तसंस्था
डमडम, चोवीस परगणा : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या दिल्लीतल्या राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेची जाहिरात आणि प्रचार करायला एकही संधी सोडत नाहीत, याचा प्रत्यय आजच्या रक्षाबंधनाच्या दिवसाने आला.Mamata Banerjee celebrates Rakshabandhan in Bengal
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने ममतांच्या दिल्ली चलो मुखवट्यांच्या राख्या लोकांना बांधून मतांच्या राजकारणाचा संदेश दिला. चोवीस परगणा जिल्ह्यातील डमडम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरांमध्ये जाऊन हिंदू आणि मुसलमान बांधवांना ममतांच्या मुखवट्याच्या राख्या बांधल्या. या राख्यांवरच दिल्ली चलोचा संदेश देण्यात आला आहे.
अशाच प्रकारचे कार्यक्रम पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतले. यातला संदेश हिंदू-मुस्लीम ऐक्य पेक्षा ममतांच्या दिल्लीतल्या राजकारणाचा महत्त्वाकांक्षेचा अधिक दिला गेला.
विधानसभा निवडणुकीत कोलकात्यातील काही मी व्यापाऱ्यांनी मोठा “ममता संदेश”, “ममता लाडू”, “ममता बर्फी” अशा मिठाया बनवून ममतांच्या प्रचारास आपला हातभार लावला होता. आता त्यात ममता मुखवट्यांच्या दिल्ली चलो संदेशाच्या राख्यांची भर पडली आहे.