विशेष प्रतिनिधी
कोलकता : तृणमुल कॉंग्रेसच्या तेजतर्रार खासदार महुआ मोईत्रा यांनी आता पश्चिम बंगालच्या राज्यपालांना टीकेचे लक्ष केले आहे. मुख्यमंत्री ममतादीदींना सतत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या राज्यपालांनी नातेवाईकांवर मेहेरनजर केल्याची टीका त्यांनी केली आहे.Mahua targets Governor of west Bengal
राज्यपालांना ‘अंकलजी’ असे संबोधत त्यांनी, राजभवनात राज्यपालांच्या नातेवाईकांची आणि निकटवर्तीयांची ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी’ (ओएसडी) म्हणून वर्णी लावली गेली असल्याची टीका केली आहे.
महुआ मोईत्रा यांनी आज ‘ट्विटर’वरून राज्यपालांवर टीका करताना राजभवनातील ‘ओएसडीं’ची नावेच जाहीर केली. त्यामध्ये अभ्युदयसिंह शेखावत (राज्यपालांच्या मेहुण्याचे पुत्र), रुची दुबे आणि प्रशांत दीक्षित (माजी ‘एडीसी’ची पत्नी आणि भाऊ), वालिकर (सध्याच्या ‘एडीसी’चे मेहुणे) आणि किशन धनकर (जवळचे नातेवाईक) यांचा समावेश आहे.
धनकर हे सातत्याने राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्ननचिन्ह उपस्थित करतात. त्यांनाही प्रश्ना विचारण्याचा आम्हाला लोकशाहीने हक्क दिला आहे, असे खासदार मोईत्रा यांचे म्हणणे आहे.
Mahua targets Governor of west Bengal
महत्त्वाच्या बातम्या
- देशांतर्गत विमान प्रवास होणार सोपा, लसीकरण झाले असल्यास आरटीपीसीआर चाचणीची राहणार नाही गरज
- शेअर बाजारात अशीही तेजी, गेल्या वर्षभरात महिन्याला सरासरी १३ लाख नवी डिमॅट अकाऊंटस, गुंतवणूकदारांची संख्या झाली ६.९७ कोटी
- हे कसले कोरोनाविरुध्द लढण्याचे आदर्श मॉडेल, देशातील सर्वाधिक मृत्यूसह महाराष्ट्राने गाठला एक लाख कोरोना बळींचा टप्पा
- ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न
- भज्जी तू सुध्दा खलिस्थानवादी! क्रिकेटपटू हरभजनसिंगने केला जर्नलसिंग भिद्रानावलेचा गौरव, शहीद म्हणून केला प्रणाम