वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने 2 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे.Maharashtra state is Number one In Coronavirus Vaccine drive
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.राज्यात सोमवारी 1239 लसीकरण केंद्रांतून सुमारे 99,699 नागरिकांचे लसीकरण केले.
महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार नागरिकांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.
महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून या पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
Maharashtra state is Number one In Coronavirus Vaccine drive
महत्त्वाच्या बातम्या
- Cyclone Tauktae : रूद्रावतार @गुजरात ; २३ वर्षांत गुजरातमधील सर्वात शक्तिशाली वादळ ; सूरत विमानतळ बंद
- मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती, तर उपमुख्यमंत्र्यांची फक्त बारामतीपुरती ; प्रकाश आंबेडकर
- रिलायन्स जिओ आता मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला एक्स्प्रेस कनेक्टिव्हिटीने जोडणार
- नारद भ्रष्टाचार प्रकरणी सुवेंदू अधिकारी यांना अटक का नाही, मॅथ्यू सॅम्युअल यांचा सवाल
- कोणत्या राज्याला किती लसी दिल्या हे केंद्र सरकारने जाहीर करावे, मनीष सिसोदियांची मागणी