• Download App
    निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, कोरोना उद्रेकावरून मद्रास हायकोर्टाने ECला फटकारले । Madras High Court slams EC over corona eruption

    निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा का दाखल करू नये, कोरोना उद्रेकावरून मद्रास हायकोर्टाने ECला फटकारले

    Madras High Court slams EC :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये राजकीय पक्षांच्या वतीने कोरोना प्रोटोकॉलला तिलांजली देण्यात आल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली. Madras High Court slams EC over corona eruption


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये राजकीय पक्षांच्या वतीने कोरोना प्रोटोकॉलला तिलांजली देण्यात आल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली.

    सद्य:परिस्थितीला केवळ आणि केवळ निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कडक शब्दांत म्हणाले. मतदानाच्या दिवशी म्हणजेच 2 मे रोजी कोविड प्रोटोकॉलची खबरदारी घ्यावी, असेही मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. असे केले नाही तर मतमोजणीवर त्वरित बंदी घातली जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. निवडणूक सभा सुरू होत्या तेव्हा आयोग काय दुसऱ्या ग्रहावर होतं का?, असा सवालही हायकोर्टाने विचारला आहे. यावर उत्तर देताना आयोगाने कोविड नियमांचं पालन केल्याचं सांगितलं. तसेच मतदानाच्या दिवशी पूर्ण नियम पाळण्यात आल्याचंही स्पष्टीकरण दिलं. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

    हायकोर्टने 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीसंदर्भातही गंभीर इशारा दिला आहे. मतमोजणीच्या दिवशी तरी किमान कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा, अन्यथा आम्ही मतमोजणी स्थगिती आणू, असा इशाराही हायकोर्टाने दिला आहे.

    Madras High Court slams EC over corona eruption

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर