• Download App
    पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; प्रमुख पाहुणे शरद पवार, NCPच्या फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर|Lokmanya Tilak Award announced to Prime Minister Modi; The chief guest is Sharad Pawar, the two leaders on the same platform for the first time after the NCP split

    पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; प्रमुख पाहुणे शरद पवार, NCPच्या फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी यासंबंधी घोषणा केली. दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. परंतु गेल्या आठवड्यातच एनसीपीत झालेल्या फुटीनंतर पवार-मोदी प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे खरच हे मान्यवर एकत्र येतील का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.Lokmanya Tilak Award announced to Prime Minister Modi; The chief guest is Sharad Pawar, the two leaders on the same platform for the first time after the NCP split

    पुरस्काराचे यंदाचे 41वे वर्ष

    ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक म्हणाले की, मंगळवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे.



    शरद पवार असतील प्रमुख पाहुणे

    पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

    मोदींनी राष्ट्रवादीवर केला आरोप

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एका जाहीर सभेत कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवत घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यानंतर शरद पवार यांनी येवला, सातारा जिल्ह्यात सभा घेऊन या फूटीमागे नरेंद्र मोदी यांचाच हात असल्याचा घणाघात केला होता. एकीकडे दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे दोन्ही नेते एका व्यासपिठावर एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

    या मान्यवरांची असेल उपस्थिती

    या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे दीपक टिळक म्हणाले. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

    Lokmanya Tilak Award announced to Prime Minister Modi; The chief guest is Sharad Pawar, the two leaders on the same platform for the first time after the NCP split

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य