• Download App
    ‘’लोकसभेच्या निवडणुका नियोजित वेळेआधी होऊ शकतात, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार’’ प्रशांत किशोरांचा दावा! Lok Sabha elections can be held before the scheduled time Nitish Kumar will flip again Prashant Kishors claim

    ‘’लोकसभेच्या निवडणुका नियोजित वेळेआधी होऊ शकतात, नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार’’ प्रशांत किशोरांचा दावा!

    ‘’२०१७ मध्ये नितीश कुमार जनतेची फसवणूक करून पळून गेले होते.’’, असंही म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज अभियानाच्या माध्यमातून बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी शनिवारी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुका नियोजित वेळेपूर्वी होऊ शकतात आणि नितीशकुमार पुन्हा पलटी मारणार आहेत. Lok Sabha elections can be held before the scheduled time Nitish Kumar will flip again Prashant Kishors claim

    प्रशांत किशोर म्हणाले की, ‘’लोकांना राजकारणाची थोडीही समज आहे, तर देशाचा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर होतो हे सर्वांना माहीत आहे.  आज नितीश कुमार यांना कोणी विचारत नाही की राज्यसभेत उपसभापती कोण आहे? आज राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे आहेत. नितीश कुमार एनडीए सोडले आहेत तर ते हे पद का सोडत नाहीत? ते म्हणाले की, बिहारच्या जनतेने २०१५ मध्ये नितीश कुमार यांना मतदान केले होते, त्यानंतर २०१७ मध्ये ते जनतेची फसवणूक करून पळून गेले.’’

    जनतेला इशारा देताना प्रशांत किशोर म्हणाले की, ‘’बिहारची जनता पुन्हा नितीशकुमारांना मत देईल, तर मग हा माणूस तुम्हाला फसवून पळून जाईल, हे लिहून ठेवा. जेव्हा सीएए आणि एनआरसीचे प्रकरण समोर आले आणि लोकांवर टांगती तलवार होती,  तेव्हा ना लालू यादव पश्चिम बंगालला गेले,  ना तेजस्वी यादव गेले, ना नितीश कुमार गेले. आज पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय झाला असता तर लोक रांगेत उभे राहून फॉर्म भरत राहिले असते, आम्ही भाजपाचा पराभव केला आहे.”

    Lok Sabha elections can be held before the scheduled time Nitish Kumar will flip again Prashant Kishors claim

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली